शुक्रवारपासून (21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात(NZ Vs IND) बेसिन रिझर्व स्टेडियमवर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात आज(23 फेब्रुवारी) तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 144 धावा केल्या आहेत. भारत अजूनही 39 धावांच्या पिछाडीवर आहे.
या सामन्याआधी 2 दिवसात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) केवळ 4 तासच झोपू शकला आहे. मात्र, याचा परिणाम इशांतने आपल्या गोलंदाजी प्रदर्शनावर पडू दिला नाही. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात न्यूझीलंड संघाचे काल 3 आणि आज 2 असे मिळून पहिल्या डावात 5 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली.
3 आठवड्यांपुर्वी इशांत रणजी ट्रॉफी दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो या कसोटी मालिकेत खेळेल की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पण त्याने त्याचा फिटनेस सिद्ध करत 24 तासांचा प्रवास करुन पहिल्या कसोटीच्या 72 तास आधी तो वेलिंग्टन येथे पोहोचला.
याबद्दल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इशांत म्हणाला की, “मी 2 दिवसांपासून झोपलो नाही. त्यामुळे आज खूप थकावट वाटत आहे. मला जशी गोलंदाजी करायची होती, तशी करू शकलो नाही. मला खेळायला सांगितले गेले आणि मी खेळलो. मी संघासाठी काहीही करू शकतो.”
“असे नाही की, मी माझ्या गोलंदाजी प्रदर्शनामुळे नाराज आहे. तर मी माझ्या शरीरामुळे नाराज झालो आहे. कारण, काल रात्री मी केवळ 40 मिनिटच झोपू शकलो. तसेच, कसोटी सामन्यापूर्वीही मी 3 तासच झोपू शकलो होतो. प्रवासाच्या थकव्यानंतर आराम केल्यास आपण मैदानावर सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन करू शकतो. म्हणून पूर्ण झोपेसारखा दुसरा कोणताही उपाय नाही.” असेही तो पुढे म्हणाला.
“दुखापत झाल्यानंतर मला वाटले होते की मी कसोटी सामना खेळूच शकणार नाही. पण, याचे सगळे श्रेय एनसीएच्या सहयोगी कर्मचाऱ्यांना जाते. मला बरे करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मला वाटले होते की, मी कसोटी खेळूच शकणार नाही. कारण दुखापतच इतकी गंभीर होती. पण मी एनसीएमध्ये 2 दिवसात 21 षटके गोलंदाजी केली म्हणून मला समझले की मी चांगल्या प्रकारे खेळू शकतो. असेही इशांत यावेळी म्हणाला.
न्यूझीलंडचा हा खेळाडू म्हणतो, भारताच्या 'त्या' फलंदाजाची विकेट ठरली टर्निंग पाँईट
वाचा- 👉https://t.co/ejZcqhm7O0👈#म #मराठी #cricket #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 23, 2020
न्यूझीलंडचा हा खेळाडू म्हणतो, भारताच्या 'त्या' फलंदाजाची विकेट ठरली टर्निंग पाँईट
वाचा- 👉https://t.co/ejZcqhm7O0👈#म #मराठी #cricket #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 23, 2020