---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बाऊचरचा खुलासा, ‘मला कोरोना झाल्याची कल्पनाच नव्हती’

On: रविवार, नोव्हेंबर 22, 2020 3:39 PM
---Advertisement---

कोरोना या साथीच्या आजाराने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. या कारणामुळेच बरेच दिवस क्रिकेट सामन्यांचे आयोजन होऊ शकले नाही. मात्र, सर्व खबरदारी घेऊन आता क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

जैव सुरक्षित वातावरणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. मात्र सर्व काळजी घेऊनही काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचा बातम्या समोर येत आहेत. एका संघ प्रशिक्षकालाही कोरोनाची लागण झाली होती. त्याबद्दल त्याने त्याचा अनुभव सांगितला आहे.

दक्षिण आफ्रिका संघाचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर याने खुलासा केला आहे की एकदा त्याला कोरोनाची लागण झाली होती, याची कल्पनाच नव्हती. राष्ट्रीय क्रिकेटपटूंबरोबर प्रशिक्षण घेत असताना 43 वर्षीय बाऊचरला अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्याला कोरोना झाल्याचे निदान झाले होते.

बुधवारी (17 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूचा कोव्हिड 19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मार्क बाऊचरने हा खुलासा केला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला कोरोनाची लागण

कोरोनाची लागण झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूने इतर दोन खेळाडूंबरोबर जवळीक साधली होती. त्यामुळे त्या दोघांनाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या निवेदनानुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. खेळाडू सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे बाऊचरला ठाऊक आहे.

कोव्हिड खेळापेक्षा मोठा – बाऊचर

टाइम्स नाऊ या वृत्तपत्राशी संवाद साधताना मार्क बाऊचर म्हणाला की,“सहा-सात दिवस खोलीत एकटेच राहाणे खूप कठीण आहे. मला एक-दोन दिवस निराश वाटले. मी नेटमध्ये फलंदाजांना चेंडू फेकण्याचे काम करत होतो. त्यामुळे मला काही वेदना जाणवत होत्या. कोव्हिड खेळापेक्षा मोठा आहे.”

कोव्हिड-19 या रोगाच्या विळख्यातून दक्षिण आफ्रिका संघ सावरल्यावर बाऊचर आगामी मालिकेच्या तयारीला लागणार आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “आम्हाला या रोगाला मागे टाकावं लागेल. दक्षिण आफ्रिका क्रिकेटला चांगली बातमी देण्याच्या स्थितीत आम्ही आहोत. आम्ही कठीण समस्येचा सामना केला आहे.”

“आम्ही नव्याने सुरुवात केली आहे. आम्हाला मूल्य जोपासावे लागेल. हे सर्व खेळातील कामगिरीवर आधारित आहे. आम्हाला उत्तम आणि आक्रमक खेळ करायचा आहे. आपल्याला खेळात चतुर राहावे लागेल,” असेही पुढे बोलताना बाऊचर म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या –

‘…म्हणून, सूर्यकुमारला भारतीय संघात जागा नाही’, निवडकर्त्याचा मोठा खुलासा

शोएब मलिक, मोहम्मद आमिर यांच्या सामना शुल्कात वाढ; पाहा किती मिळणार रक्कम

…म्हणूनच भारतीय वेगवान गोलंदाज झाले यशस्वी, मोहम्मद शमीचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---