पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित सर्वबाद ३२९ धावा ठोकल्या. इंग्लंडला मालिका विजयासाठी या धावा पार कराव्या लागतील. मात्र, या सामन्यात तूफानी अर्धशतक झळकावणारा रिषभ पंत बाद होऊ नये, अशी प्रार्थना चक्क एका माजी इंग्लिश क्रिकेटपटू करत होता.
हा दिग्गज म्हणाला, पंत बाद होऊ नये
इंग्लंडचा माजी कर्णधार व दिग्गज अष्टपैलू अँड्र्यू फ्लिंटॉफ हा इंग्लंडच्या भारत दौऱ्याविषयी ट्विटरवरून सातत्याने व्यक्त होत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना सुरू असताना त्याने एक ट्विट करत लिहिले, ‘मला वाटते की इंग्लंडने सामना जिंकावा. मात्र, रिषभ पंत बाद होऊ नये. त्याला खेळताना पाहणे चांगले वाटते.’
फ्लिंटॉफ कसोटी मालिके वेळीही वारंवार ट्विट करत आपली मते मांडत होता.
Although I want @englandcricket to win I didn’t want @RishabhPant17 to get out , he’s so good to watch ????????@robkey612 @SkyCricket
— Andrew Flintoff (@flintoff11) March 28, 2021
रिषभने केली तुफानी फटकेबाजी
निर्णायक सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने यष्टीरक्षक रिषभ पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली. त्याने या संधीचे सोने करत ६२ चेंडूत ५ चौकार व ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च ७८ धावा ठोकल्या.
रिषभने जवळपास दीड वर्षानंतर वनडे संघात पुनरागमन करत दुसऱ्या वनडे सामन्यात ७७ धावांची विस्फोटक खेळी केली होती. कसोटी मालिकेत रोहित शर्मानंतर तो भारतासाठी सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज होता. टी२० मालिकेतही त्याने काही उत्कृष्ट खेळ्या केल्या होत्या.
भारतीय संघाची मोठी धावसंख्या
भारतीय संघाने सलग तिसऱ्या सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावा धावाफलकावर लावल्या. रोहित शर्मा व शिखर धवन यांनी शतकी सलामी दिली. त्यानंतर, रोहित, धवन व कर्णधार विराट कोहली नियमित अंतरात बाद झाल्यानंतर भारताच्या डावात काहीशी घसरगुंडी झाली. परंतु, रिषभ पंत व हार्दिक पंड्या यांनी ९९ धावांची भागीदारी केली. पंत व हार्दिक यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावली. भारतीय संघाने सर्वबाद होत ३२९ धावा बनविल्या. इंग्लंडसाठी मार्क वूडने सर्वाधिक ३ बळी आपल्या नावे केले.
महत्त्वाच्या बातम्या –
संचारबंदीच्या काळात मुंबईत होणार आयपीएलचे सामने? पाहा काय आहे सरकारचा निर्णय
आयपीएल २०२१: राजस्थान रॉयल्ससाठी आनंदाची बातमी; ‘हा’ गोलंदाज लवकरच होतोय संघात सामील
शार्दुलने ठोकला खणखणीत षटकार, गोलंदाजी करत असलेल्या स्टोक्सने चेक केली बॅट






