मुंबई । अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान यांच्या आईचे 18 जून रोजी निधन झाले आहे. राशीदची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. आईच्या निधनाची बातमी स्वतः राशिद खान अनेक ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
राशिद खानने 12 जून रोजी आपल्या चाहत्यांना भावनिक आव्हान करत ट्विटरवर लिहले होते की, “माझी आई आजारी आहे तिच्यासाठी प्रार्थना करा”. मागील दोन वर्षात रशिद खानचे वडील आणि आई यांचे निधन झाले आहे.
Ya Allah ! Give my mother a good health. Please remember her in your prayers 🙏🙏
— Rashid Khan (@rashidkhan_19) June 12, 2020
राशिदने ट्विटरवर लिहले की, “आई तु माझं घर होतीस. माझ्या जवळ घर नव्हते तेव्हा तू होती. माझा विश्वास बसत नाही की, तू आता या जगात नाहीच. मी सदैव तुझी आठवण करत राहील तुझ्या आत्म्याला शांती मिळो!” पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू फैजल इकबाल यांनी देखील राशीदच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.
إِنَّا لِلَّهِ وَإِنَّا إِلَيْهِ رَاجِعُوْنَ
You were my home my mother I had no home but you . i can’t believe you are no more with me you will missed forever . Rest In Peace #MOTHER 😢😢— Rashid Khan (@rashidkhan_19) June 18, 2020
राशिद खान इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबाद या फ्रेंचायजी टीमकडून खेळतो राशिदचे भारतात खूप फॅन्स आहेत.
राशिदने अफगाणिस्तान संघाकडून 4 कसोटी आणि 71 वनडे त्यासोबत 48 टीमसाठी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.