आयपीएल 2019 साठीचा लिलाव जयपूर, राजस्थान येथे 18 डिसेंबरला पार पडला. या लिलावात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवलेल्या युवा खेळाडूंना सर्वच संघांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. या लिलावात 346 खेळाडूंचा 70 जागांसाठी लिलाव होणार होता.
त्यानुसार या लिलावात 346 खेळाडूंमधूल एकूण 60 खेळाडूंवर बोली लागली. त्यात 40 भारतीय आणि 20 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
या लिलावात मात्र सौराष्ट्रचा लेफ्ट आर्म स्पिनर धर्मेंद्रसिंह जडेजाने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा आयपीएल ट्रायलसाठीही समावेश करण्यात आला नव्हता.
धर्मेंद्रसिंह सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम गोलदांज असून त्याने मागील सहा सामन्यात 32 विकेट्स घेतल्या आहेत. मागील दोन हंगामातही त्याने उत्तम कामगिरी केली आहे.
“मागील वर्षीही मी रणजी ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम गोलंदांजापैकी एक होतो. यावर्षीही मी चांगली कामगिरी करत मागील दोन सामन्यात 19 विकेट्स घेतल्या असून त्यात एका हॅट्ट्रीकचा समावेश आहे. मला वाटले माझ्या या कामगिरीमुळे यावर्षी तरी आयपीएलचे संघ मला घेतील पण तसे काही झालेच नाही”, असे निराश झालेल्या धर्मेंद्रसिंहने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
“मला आयपीएलच्या ट्रायलाही बोलवण्यात आले नाही”, असेही धर्मेंद्रसिंह म्हणाला.
धर्मेंद्रसिंहने 40 प्रथम श्रेणीचे सामने खेळताना 168 विकेट्स घेतल्या आहेत.
यावर्षीच्या आयपीएल लिलावात मागील वर्षीप्रमाणेच जयदेव उनाडकट हा वेगवान गोलंदाज सर्वात महागडा कॅप(किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला खेळाडू) खेळाडू ठरला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावत संघात घेतले आहे.
त्याच्याप्रमाणेच तमिळनाडूचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्थी हा देखील यावर्षीचा आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्यालाही 8 कोटी 40 लाखांची बोली लावत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने संघात सामील करुन घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पुढील २४ तासांत टीम इंडियाची घोषणा, धोनीबद्दल होणार हा मोठा निर्णय