---Advertisement---

भारतीय क्रीडाविश्व कोरोनाच्या विळख्यात! ‘ही’ मानाची स्पर्धा केली स्थगित

On: गुरूवार, डिसेंबर 30, 2021 9:25 AM
Football
---Advertisement---

भारतातील दुसरी सर्वात मोठी फुटबॉल लीग असलेल्या आय- लीगच्या हंगाम स्थगित करण्यात आला आहे. आयोजकांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. त्या ट्विटनुसार, भारतात सध्या सुरू असलेली फुटबॉल स्पर्धा आय – लीग कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.

कोविडने आय – लीगच्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे खेळाडू आणि संघ अडचणीत आले आहेत. आय-लीग बुधवारी कोरोना संसर्गाच्या विळख्यात अडकली. अनेक संघांतील १५ ते २० खेळाडू व कर्मचारी बायो-बबलमध्ये राहूनही कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

रियल काश्मीर एफसीचे पाच खेळाडू मोहम्मदेन स्पोर्टिंग आणि श्रिनिधी डेक्कन एफसीचे प्रत्येकी एक खेळाडू मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत. यासह काही अधिकारी व कर्मचारी देखील कोरोनाबाधित आढळून आले.

या परिस्थितीमुळे तातडीची एक बैठक सायंकाळी चार वाजता बोलावण्यात आली. यामध्ये लीग सुरू ठेवायची की रद्द करायची याबाबत निर्णय घेता येईल. या बैठकीत लीग दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. लीगच्या या हंगामातील आत्तापर्यंत १२ सामने आयोजीत करण्यात आले आहेत. केंकरे एफसी वगळता इतर सर्व संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सलग दुसऱ्या विजयासह एटीके मोहन बागान ‘टॉप फोर’मध्ये

ओदिशा एफसीला ६-१ ने चिरडत हैदराबाद एफसी दुसऱ्या स्थानी

बंगलोरला हरवून ‘टॉप फोर’मध्ये स्थान मिळवण्याचे चेन्नईयनचे लक्ष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---