दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स याने निवृत्तीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आपल्याला वारंवार बाद करत होता आणि त्यामुळेच त्याने कंटाळून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, असे त्याने गमतीने म्हटले आहे. डिव्हिलियर्सच्या मते तो चहलचा ‘बनी’ बनला होता.
एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) याने आता एक मोठा खुलासा केला असून 2018 मध्ये जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने त्याला खूप त्रास दिला होता. डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान सांगितले की, “मी माझ्या होम ग्राउंड सेंच्युरियनवर खेळत होतो आणि मला आठवते की, तिथे खूप गरमी होती. जवळपास 30 धावा केल्यावर मी खूप थकलो होतो आणि काही सोपे फटके मारण्याचा विचार मी केला. चहलला हे माहीत असतानाही मी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करेन. तो खूप हुशार आहे, कारण तो बुद्धिबळपटू आहे. बेल्सचा आवाज मला अजूनही आठवतो. त्याबद्दल युझवेंद्र चहलचे आभार. मी निवृत्ती घेण्याचे खरे कारण तूच होतास. मी आता तुझाच बनी आहे.”
दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यावेळी त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते, कारण डिव्हिलियर्स चांगली फलंदाजी करत होता आणि पूर्णपणे तंदुरुस्त होता. डिव्हिलियर्सने क्रिकेट जगतातील अव्वल फलंदाजांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्याने 114 कसोटी सामन्यांमध्ये 8765 धावा केल्या आणि 278 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर त्याने 228 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 9577 धावा केल्या आहेत. युजवेंद्र चहल आणि एबी डिव्हिलियर्स अनेक वर्षे आयपीएलमध्ये आरसीबीकडून एकत्र खेळले आहेत. (I retired from cricket because of you AB de Villiers shocking statement about India bowler)
हेही वाचा
बाबो! पदार्पणाच्या कसोटीत पाकिस्तानी गोलंदाजाचा कहर, ऑस्ट्रेलियाच्या अर्धा डझन फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता
शॉट असा मारा की, काहीही होवो, पण सिक्स गेला पाहिजे! रसेलने धडपडत मारलेला षटकार पाहिला का? Video Viral