---Advertisement---

‘मी स्वत:ला त्यांच्या…’, रोहित शर्माने सांगितले त्याच्या यशामागचे रहस्य

On: गुरूवार, ऑक्टोबर 26, 2023 6:53 PM
Rohit Sharma
---Advertisement---

रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत 5 सामने खेळले असून सर्व सामने जिंकून प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला आहे. भारताच्या चांगल्या कामगिरीमागे कर्णधार रोहित शर्माचा मोठा हात आहे. तो खेळाडूंना चोखपणे सांभाळत आहे. त्याचबरोबर नुकतेच रोहितने त्याच्या यशामागील रहस्यही सांगितले आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “मी स्वत:ला दुसऱ्या खेळाडूच्या जागी ठेवून विचार करत असतो आणि पुढे काय आवश्यक आहे याचा विचार करतो. जेव्हा खेळाडूंचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला प्रत्येक खेळाडूला समजून घेणे आणि त्यांच्या गरजा जाणून घेणे आवश्यक असते. एखाद्या खेळाडूला काय आवडते आणि काय आवडत नाही हे तुम्हाला माहित असले पाहिजे, कारण सांघिक खेळात ते एक किंवा दोन खेळाडूंबद्दल नसते, ते प्रत्येकासाठी असते. जेव्हा आपण विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा खेळण्यासाठी येतो तेव्हा प्रत्येक खेळाडूची स्वतःची भूमिका असते जी त्याने चांगली निभावली पाहिजे.”

भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “म्हणूनच प्रत्येक खेळाडूची मानसिक स्थिती चांगली असणे महत्त्वाचे आहे. मी खूप भाग्यवान आहे की माझ्याकडे खूप चांगला संघ आहे. आमचा सपोर्ट स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे. संघाला यशस्वी करण्यासाठी काय करावे लागते हे मी मैदानावरील माझ्या अनुभवातून शिकलो आहे. प्रत्येक खेळाडूला स्वातंत्र्य दिले पाहिजे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत तुमच्यावर दडपण असते. अशा परिस्थितीत तुमचा संघ एकसंध राहणे महत्त्वाचे आहे. येथे हे महत्वाचे आहे की, प्रत्येकजण चांगल्या झोनमध्ये राहतो, मुक्तपणे आणि निर्भयपणे खेळतो आणि बाहेर काय घडत आहे याचा विचार करू नये.”

भारताचा विश्वचषकातील पुढील सामना रविवारी (29 ऑक्टोबर) ला लखनऊ येथे इंग्लंडविरूद्ध होणार आहे. भारताने विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत आणि पाचही सामने जिंकले आहेत. भारत 10 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. (I see myself as their Rohit Sharma shared the secret behind his success)

महत्वाच्या बातम्या 

आफ्रिदीला अजूनही आपल्या खेळाडूंवर आत्मविश्वास; म्हणाला, ‘विश्वचषक आपलाच…’‘इंग्लंडचे फलंदाज स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी…’ गतविजेत्यांची खराब फलंदाजी पाहून गंभीरची लक्षवेधी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---