---Advertisement---

टीम इंडियातून बाहेर असलेल्या धोनीसाठी हा खेळाडू म्हणतो, मला काहीतरी खास करायचंय

On: शुक्रवार, मे 1, 2020 3:51 PM
---Advertisement---

आयपीएलमधील फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोला आपल्या संघाचा कर्णधार एमएस धोनीसाठी विशेष असे काहीतरी करायचे आहे.

वेस्ट इंडीज संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ब्रावो (Dwane Bravo) सुरुवातीला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून खेळत होता. परंतु २०११मध्ये सीएसकेने (Chennai Super Kings) त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. तिथून पुढे तो सीएसकेच्या संघात मोलाचे योगदान देऊ लागला. ब्रावोने सीएसकेकडून आतापर्यंत ११८ विकेट्स घेतल्या आहेत. अशामध्ये ब्रावोची धोनीबरोबर खूप जवळीक वाढली होती.

याबद्दल बोलताना ब्रावो म्हणाला की, “मला धोनीसाठी विशेष काहीतरी करायचे आहे. तसेच तो आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. तसेच त्याची कारकीर्द खूप शानदार राहिली आहे. धोनीचा माझ्याबरोबरच इतर खेळाडूंच्या कारकीर्दीतही मोलाचे योगदान राहिले आहे.”

“रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीही (Virat Kohli) त्याची प्रशंसा करतात. त्याने अनेक खेळाडूंना संधी दिली. यामध्ये असे काही खेळाडू होते, ज्यांनी कधी विचारही केला नसेल की, ते भारतीय संघाकडून खेळतील. त्यामुळे मला त्याच्यासाठी काहीतरी करायचे आहे,” असेही ब्रावो पुढे म्हणाला.

क्रिकबझच्या एका कार्यक्रमात ब्रावो म्हणाला की, “सीएसकेने मला एक ओळख दिली. एक काळ होता, ज्यामध्ये माझ्या कारकीर्दीत अनेक चढ-उतार आले. मला कसोटी संघातून बाहेर ठेवण्यात आले होते. तसेच वनडे संघातही कधी सामील केले तर कधी बाहेर केले होते.”

“परंतु सीएसकेकडून खेळताना माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत बदल झाला. मी सीएसकेबरोबर प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. माझी कारकीर्द सीएसकेकडून खेळताना खूप यशस्वी राहिली. मी संघात असताना सीएसकेने आयपीएलचे २ विजेतेपद पटकावले. तसेच मी पर्पल कॅपही जिंकली. पुढे चॅम्पियन्स लीगमध्येही चमकदार कामगिरी केली,” असेही ब्रावो पुढे म्हणाला.

ट्रेंडिंग घडामोडी-

-त्याच्यावर अनेकदा टीका झाली पण त्याने मात्र बॅटनेच उत्तरं दिली!

-एकदा नाही, दोनदा नाही तर या ५ वेळा रोहितने गोलंदाजांना धु धु धुतले

-सामना झाल्यावर स्टंप गोळा करण्याचा छंद धोनीने का थांबवला???

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---