सध्या वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यातील वाद दिवेसंदिवस चिघळत चालला आहे. संघातील अनेक खेळाडू राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त बाकी टी२० लीगमध्ये खेळण्याला अधिक प्राधान्य देतात, असे दिसले आहे. यामुळेच वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी मोठ्या प्रमाणात निराशा व्यक्त केली होती. त्यांनी काही खडे बोलही करत थेट अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलवर निशाना साधला. यावर रसेलने प्रत्युत्तर देत त्याला आजही राष्ट्रीय संघाकडून खेेळण्याची इच्छा आहे, असे म्हटले आहे.
आंद्रे रसेल (Andre Russell) याने सिमन्स यांच्या विधानाला उत्तरे दिली आहे. त्याने म्हटले, सिमन्स यांच्याकडून अशाच प्रकारच्या विधानाची अपेक्षा होती. मात्र यावर मी कोणतीही प्रतिक्रीया देणार नाही आणि गप्पच राहणार आहे. तसेच रसेलला वेस्ट इंडिजच्या संघाकडून खेळण्याची इच्छा आहे. याबाबत त्याने म्हटले, “मला संघाकडून खेळायचे आहे. संघासाठी मला एक किंवा दोन विश्वचषक जिंकायचे आहेत.”
मागील काही दिवसांपूर्वीच फिल सिमन्स (Phil Simmons) यांनी खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास उत्सुकता दाखवत नाही, असे विधान केले होते. “खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी स्वतहून तयारी दर्शवली पाहिजे,” असेही त्यांनी म्हटले होते.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना माजी दिग्गज अष्टपैलू डॅरेन सॅमीने रसेलला वेस्ट इंडिजकडून खेळण्याबाबत विचारले. यावर रसेल म्हणाला, “माझ्यासाठी वेस्ट इंडिजचे स्थान सर्वात उच्च आहे. मी नेहमी देशासाठी खेळण्यास उत्सुक आहे. मात्र बोर्डचे ज्या काही अटी आहेत आणि आमच्या ज्या अटी आहेत त्यामध्ये तारतम्य नाही. त्यांना आमच्या निर्णयाचाही विचार करायला पाहिजे. आम्हाला स्वतला कुटुंब आहे आणि जेव्हा आम्ही एका क्षेत्रात काम करण्याचे ठरवतो, त्यामध्ये चांगल्या संधीही मिळाल्या हव्या. आज मी ३४ वर्षाचा आहे आणि मला वेस्ट इंडिजसाठी किमान एक तरी विश्वचषक जिंकायचा आहे.”
रसेल हा वेस्ट इंडिजकडून शेवटचा सामना २०२१मध्ये खेळला आहे. यानंतर तो संघासाठी नाही खेळला. त्यानंतर तो जगातील वेगवेगळ्या टी२० लीगमध्ये खेळत आहे. सध्या तो इंग्लंड येथे सुरू असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये खेळत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रतिष्ठेच्या फाईट आधी विजेंदरची सिंहगर्जना! म्हणाला…
सचिनला ओळखत नव्हतो म्हणणाऱ्या अख्तरला आकडेच पाडतायेत तोंडघशी
क्रिकेटमध्ये अवतरलं रोनाल्डोचं ‘सीयू’ सेलिब्रेशन! इमरान ताहिरने केलेल्या करामतीचा व्हिडिओ व्हायरल