---Advertisement---

सुपर ओव्हरदरम्यान रोहित शर्मा करत होता ‘हा’ विचार

On: बुधवार, जानेवारी 29, 2020 8:00 PM
---Advertisement---

आज (29 जानेवारी) सेडन पार्क (Seddon Park) येथे भारताने न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) तिसऱ्या सामन्यात (3rd Match) सुपरओव्हरमध्ये (Super Over) विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0ने विजयी आघाडी (Lead By 3-0) घेतली आहे.

या सामन्यात भारताचा उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) सुुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूत 10 धावांची आवश्यकता असताना 2 षटकार मारले आणि हा सामना भारताला जिंकून दिला.

हा सामना झाल्यानंतर रोहित शर्माने आपल्या कामगिरीबद्दल खुलासा केला आहे.

“मी सुपर ओव्हरमध्ये कधीही फलंदाजी केलेली नाही. मला यावेळी कशाप्रकारे फलंदाजी करावी याची कल्पना नव्हती. पहिल्या चेंडूवर फटकार मारावा की थोडा वेळ घ्यावा. हे मला त्यावेळी समजलेच नाही,” असे आपल्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित म्हणाला.

रोहितला शेवटच्या 2 चेंडूंबद्दल विचारले असता रोहित म्हणाला की, “मला फक्त स्थिर राहायचे होते. या 2 चेंडूंवर मी चांगले योगदान देण्याचा माझा प्रयत्न होता.”

आपल्या खेळीबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, “मला या सामन्यात मी बाद झाल्याचे दु;ख आहे. पहिल्या 2 सामन्यांमध्ये मी चांगल्या धावा केल्या नव्हत्या. त्यामुळे आज मला चांगली कामगिरी करायची होती.”

“मला माहिती होते की आज आम्ही सामना जिंकून मालिकाही जिंकू. अशाप्रकारच्या महत्त्वाच्या सामन्यात वरिष्ठ खेळाडूंना जबाबदारी घ्यावी लागते,” असेही रोहित यावेळी म्हणाला.

या सामन्यात प्रथम फलंदाजीला आल्यानंतर भारताने 5 बाद 179 धावा केल्या. भारताकडून खेळताना रोहितने 40 चेंडूत सर्वाधिक 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये 3 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. पण न्यूझीलंडनेही निर्धारित 20 षटकात 6 बाद 179 धावा केल्याने सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सुपर ओव्हर घ्यावी लागली.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 17 धावा करत भारताला 18 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुलने मिळून 20 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये रोहितने 15 आणि राहुलने 5 धावा केल्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---