भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात ४ मार्चपासून २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Matches Test Series) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली (Mohali Test) येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम येथे खेळला जात आहे. या सामन्यात ३३ वर्षीय विराट कोहली (Virat Kohli) ७ वर्षांनंतर पहिल्यांदाच केवळ फलंदाज म्हणून कसोटी सामना खेळतो आहे. तसेच हा सामना त्याचा कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना (Virat Kohli’s 100th Test) असल्याने त्याच्यासाठी या सामन्याचे अत्यंत महत्त्व आहे.
चाहत्यांनाही या मोठ्या सामन्यात विराटकडून त्याचा शतकांचा दुष्काळ संपवण्याची अपेक्षा आहे. परंतु पहिल्या डावात विराट अर्धशतकही न करता बाद झाल्याने अजून त्याची ही प्रतिक्षा संपलेली नाही. यादरम्यान विराटच्या शतकाच्या प्रतिक्षेत असलेल्या एका चाहत्याने स्वत:लाच विचित्र वचन दिले (Fan Promised Himself Not To Get Married Till Virat’s 71st Century) आहे. तो चाहता सध्या चर्चेत आहे.
सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एक चाहता हातात मोठा बॅनर घेऊन उभा आहे. या बॅनवर मोठ्या अक्षरात लिहिले गेले आहे की, “जेव्हापर्यंत विराट त्याचे ७१ वे शतक (Virat Kohli’s 71st Test Century) करत नाही. तेव्हापर्यंत मी लग्न करणार नाही.”
See the promise of Virat Kohli's Fans from himself. They want Virat Kohli to score his 71st Century very soon. This is Today's pic from Mohali Stadium. pic.twitter.com/ksV6bluucr
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 5, 2022
हा विराटप्रेमी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी असा बॅनर घेऊन स्टेडियममध्ये बसलेला दिसला. यानंतर त्याचे फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
३ वर्षांपासून विराटच्या बॅटमधून निघाले नाही शतक
विराटने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये केले होते. तेव्हा त्याने कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर बांग्लादेशविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात १३६ धावांची शानदार खेळी खेळली होती. हा भारतीय संघाचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना होता आणि भारतीय संघाने हा ऐतिहासिक सामना १ डाव व ४६ धावांनी जिंकला होता. या सामन्यानंतर मात्र विराटच्या बॅटमधून एकही आंतरराष्ट्रीय शतक निघालेले नाही.
विराटच्या त्याच्या ७० शतकांसह सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्याच्या विक्रमात तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. या विक्रमात सचिन तेंडूलकर अव्वलस्थानी आहे, ज्याच्या नावे सर्वाधिक १०० शतके आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ७१ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एक-दोन नव्हे पाचव्यांदा रिषभ पंतचे हुकले कसोटी शतक; म्हणाला, ‘कधी कधी मला असे वाटते…’
इमाम-उल-हकनंतर आता अझहर अलीनेही ठोकलं शतक; ऑस्ट्रेलिया संघ दबावात
मोठी बातमी! साहाला धमकावणाऱ्या पत्रकाराचं नाव शेवटी कळलंच; बीसीसीआय देणार उत्तरे