कोलकाता। भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात सध्या कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) या मालिकेतील दुसरा सामना झाला होता. या सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. दरम्यान, या सामन्यात नवखा खेळाडू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने युजवेंद्र चहल याच्या (Yuzvendra Chahal) गोलंदाजीवर झेल सोडला, याबद्दल खुद्द चहलनेच गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.
या मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या रवी बिश्नोईने पहिल्या दोन्ही सामन्यात चहलच्याच गोलंदाजीवर झेल सोडले. याबद्दल दुसऱ्या टी२० सामन्यानंतर स्टारस्पोर्ट्सच्या शोमध्ये इरफान पठाणने चहलला प्रश्न विचारला की, रवी बिश्नोई त्याला रात्री जेवायला कुठे घेऊन जाणार आहे?
यावर उत्तर देताना चहल म्हणाला, ‘पहिले तर मी त्याला खोलीच्या कोपऱ्यात (खोपच्यात) घेऊन जाणार आहे.’ चहलचे हे उत्तर ऐकून स्टुडिओमध्ये असलेल्या सर्वांना हसू आवरले नाही.
Me- Bishnoi kahan pe dinner pe leke jaa raha hai Apko ?
Yuzvendra Chahal – "pehle toh usse main khopche mein leke jaunga" 😂😂😂 Epic @yuzi_chahal— Irfan Pathan (@IrfanPathan) February 18, 2022
दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी सुरू असताना १० व्या षटकात निकोलस पूरनने चहलविरुद्ध डीप मिडविकेटला मोठा फटका खेळला होता. तिथे बिश्नोई क्षेत्ररक्षण करत होता. पण त्याच्या हातून तिथे झेल सुटला. त्याच्याकडून झालेली ही चूक पाहून रोहित शर्मा आणि चहल नाखूश झाले होते.
😂😂🔥🔥 #YuzvendraChahal #RaviBishnoi #IrfanPathan #AkashChopra #INDvsWI https://t.co/6rDIzR74t4 pic.twitter.com/KK4MhjmGCJ
— Harshit Poddar (@harshitpoddar09) February 19, 2022
या सामन्यात भारताने विराट कोहली (५२) आणि रिषभ पंत (नाबाद ५२) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या होत्या. त्यानंतर १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला २० षटकांत २० षटकांत ३ बाद १७८ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून निकोलस पूरनने ६२ आणि रोवमन पॉवेलने ६८ धावा केल्या होत्या. पण त्यांना वेस्ट इंडिजला विजय मिळवून देता आला नाही. भारताकडून युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल बनणार किंग्सचा प्रशिक्षक?
मेगा लिलावात कोट्यावधी रुपये मिळाल्यानंतर ‘अशी’ होती मार्क वुडच्या पत्नीची प्रतिक्रिया
‘या’ दिवशी होणार आयपीएल २०२२ हंगामाला सुरुवात? महाराष्ट्रात साखळी सामने होण्याची शक्यता