जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष आता इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेवर आहे. ही मालिका ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने गुजरातचा युवा वेगवान गोलंदाज अर्जुन नागवासवालालाही राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान दिले आहे. नुकतेच, त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
युवा २३ वर्षीय नागवासवाला ४६ वर्षानंतर भारतीय पुरुष संघात निवडलेला पहिला पारशी क्रिकेटपटू आहे. त्याच्या आधी फारूक इंजिनियर भारतीय संघाचे सदस्य होते, ज्यांनी १९७५ मध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
नुकताच नागवासवालाने एका मुलाखती दरम्यान बर्याच खास गोष्टी उघड केल्या आहेत. दरम्यान, जेव्हा त्याला असे विचारले गेले की त्याला कोणत्या क्रिकेटपटूविरुद्ध खेळायला आवडणार नाही. त्याला उत्तर देताना त्याने भारतीय कर्णधार विराट कोहली याचे नाव घेतले आहे.
नागवासवाला म्हणाला की तो मैदानावर आणि मैदानाबाहेर पूर्णपणे वेगळा आहे. पण मैदानात विराट कोहलीशी वाद घालण्याची त्याला कधीच इच्छा नाही.
तो म्हणाला, “मला विराट कोहलीशी संघर्ष करण्याची इच्छा नाही. तो मैदानात व बाहेर कसा आहे हे आम्हा सर्वांना माहित आहे. तो अगदी विरुद्ध आहे. म्हणूनच मी कधी त्याच्याशी मैदानावर वाद घालणार नाही.”
त्याशिवाय तो म्हणाले की, “जर मला संधी मिळाली असती तर मला भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करण्याची इच्छा आहे.” पुढे बोलताना नागवासवालाने आपल्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगताना दिशा पटानीचे नाव घेतले आहे.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, केएलराहुल, वृद्धिमान सहा आणि उमेश यादव.
राखीव खेळाडू – अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अरजन नागवसवाला
महत्वाच्या बातम्या
धोनीच्या भिडूचा ‘फुटबॉल किक रनआऊट’ तूफान व्हायरल, तुम्हीही घ्या पाहून
लंकादहन करण्यासाठी ‘यंग ब्लू आर्मी’ होतेय सज्ज, बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ
‘या’ क्रिकेटपटूंचा छंदच न्यारा, आकर्षक मिशीमुळे राहतात चर्चेत; एकाने तर मिशीचा काढलाय विमा