सध्या सर्वत्र ‘द हंड्रेड’ स्पर्धेचे वारे पसरले आहे. टी-२० पेक्षा ही छोट्या फॉरमॅटला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक युवा खेळाडू या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत. परंतु माजी ऑस्ट्रेलियन कर्णधारांना क्रिकेटचे हे स्वरूप आवडले नाही. त्यांनी या स्पर्धेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
इएसपीएन क्रीकइन्फो सोबत चर्चा करताना, माजी इंग्लिश कर्णधार इयान चॅपल यांनी म्हटले की, “द हंड्रेड स्पर्धेसारख्या छोट्या फॉरमॅटला सुरू करण्यामागचे कारण म्हणजे, टीव्ही अधिकाऱ्यांद्वारे बक्कळ पैशाची कमाई करणे आणि ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणे आहे. अनेकदा असे म्हटले गेले आहे की,खेळाचे स्वरूप छोटे केल्याने हा खेळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवला जाऊ शकतो. टी -२० क्रिकेट हे करू शकते.”(Ian Chappell believes t29 is enough cricket don’t need shorter format)
तसेच ते पुढे म्हणाले की, “क्रिकेट हा ११ खेळाडूंचा सांघिक खेळ आहे. या खेळात चांगली कामगिरी केल्याने खेळाडूंना समाधान मिळत असते. त्यामुळे युवा खेळाडूंना हा खेळ खूप आवडतो. कुठलाही नवीन फॉरमॅट सुरू करण्यापूर्वी प्रशासकांनी याचा विचार करायला हवा.”
इयान चॅपल यांनी स्पष्ट शब्दात द हंड्रेड स्पर्धेला निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, “यापूर्वीच छोट्या फॉरमॅटच्या मार्केटमध्ये टी -१० लीग स्पर्धा आहे. तसेच द हंड्रेड हे एक साधन आहे, जे या प्रकारच्या छोट्या क्रिकेट प्रकाराला मुख्य प्रवाहात आणू इच्छिते.”
तब्बल ३ वर्ष वाट पाहिल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेला परवानगी दिली आहे. परंतु, अनेक दिग्गज खेळाडूंनी ही स्पर्धा निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी देखील या स्पर्धेला फिकी स्पर्धा असल्याचे म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
“बेन स्टोक्स एका संघात दोन खेळाडूंसारखा, त्याची अनुपस्थितीत भारताला फायद्याचीच”
भारतीय दिग्गजाने निवडला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ; चहल, कुलदीपला दिले नाही स्थान
‘तू भारताची शान आहेस’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २ ऑलिंपिक पदकं जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूचं कौतुक