---Advertisement---

ऑसी दिग्गजाने अश्विनला म्हटले सर्वश्रेष्ठ गोलंदाज, पण माजी भारतीय क्रिकेटरला नाही पचली स्तुती!

On: रविवार, जून 6, 2021 2:46 PM
Photo Courtesy : ICC Twitter AC
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. भारतीय संघासाठी गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने मोलाची भूमिका बजावली आहे. नुकत्याच इंग्लड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा कीर्तिमान केला होता.

अनके दिग्गज क्रिकेटपटूंनी असेही म्हटले आहे कि, अश्विन येणाऱ्या काळात ८०० गाडी बाद करणारा गोलंदाज ठरू शकतो. अशातच ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपल यांनी अश्विनला वर्तमान काळातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे म्हटले आहे. परंतु या गोष्टीवर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर हे असहमत दिसून आले आहे. यासोबतच त्यांनी प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

इयान चॅपल यांनी अश्विन सर्वोत्कृष्ट गोलंदाज असल्याचे म्हटले होते. याबाबत भाष्य करताना संजय मांजरेकर यांनी म्हटले कि, “सर्व लोक अश्विनला वर्तमान काळातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे असे म्हणतात. परंतु मी या गोष्टीशी असहमत आहे. कारण अश्विनने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या देशांमध्ये एकदाही ५ गडी बाद करण्याचा किर्तिमान केला नाहीये. जर तुम्ही भारतातील खेळपट्टीवर दमदार कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलत असाल तर गेल्या ४ वर्षांत रवींद्र जडेजानेही अश्विन इतकेच गडी बाद केले आहेत.”

इयान चॅपल यांनी दिले प्रत्त्युत्तर
संजय मांजरेकर यांनी केलेल्या या वक्तत्यावर इयान चॅपल यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. चॅपल यांनी वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज जोएल गार्नरचे उदाहरण देत म्हटले की, “जर तुम्ही गार्नरची कामगिरी पाहाल तर त्याने सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला नाहीये. जेव्हा तुम्ही त्याची कारकीर्द पाहाल तर तुम्हाला ती इतकी प्रभावशाली दिसून येणार नाही. याचे कारण असे की, त्या संघात आणखी ३ उत्कृष्ट गोलंदाज होते. माझ्या मते गेल्या काही वर्षात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ज्यामुळे भारतीय गोलंदाजांना गडी बाद करणे सोपे जात आहे.”

भारतीय संघाला येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका देखील खेळायची आहे. यामध्ये आर अश्विनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

नंबर १ फॅनगर्ल! विराटसाठी ओलांडल्या होत्या सर्व सीमा; म्हणाली, ‘कृपया मला कोहली द्या’

‘कोहली-विलियम्सनच्या नेतृत्त्वात मोठे अंतर, WTC फायनलमध्ये दोघांची अग्निपरिक्षा,’ माजी प्रशिक्षकाचे मत

स्टोक्सच्या सावत्र वडिलांनी गोळी झाडून केलती मुलांची हत्या, वाचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---