---Advertisement---

INDvsENG: टीम इंडियाने इंग्लंडच्या ‘या’ उणीवेचा फायदा घेतला; माजी दिग्गजाने मांडले मत

On: सोमवार, मार्च 1, 2021 10:41 AM
---Advertisement---

जगातील सर्वात मोठ्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १० गडी राखून विजय मिळवला. हा सामना ५ दिवसांऐवजी २ दिवसातच संपला होता. तसेच या विजयानंतर भारतीय संघाने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीबाबत अनेक दिग्गजांनी आपले मत मांडले होते अशातच माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू इयान चॅपेल यांनी देखील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आपले मत मांडले आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन याने ७ आणि अक्षर पटेल याने ११ गडी बाद केले. यामुळे इंग्लंड संघाला पहिल्या डावात अवघ्या ११२ आणि दुसऱ्या डावात अवघ्या ८१ धावाच करता आल्या आणि सामना भारतीय संघाने १० गडी राखून जिंकला.

याविषयी बोलताना इयान चॅपेल यांनी ईएसपीएन क्रिकइंफोतील आपल्या कॉलममध्ये लिहले, ‘भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात ३ फिरकी गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला कारण. दुसऱ्या कसोटी सामन्यात, कर्णधार रूटला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला फिरकी गोलंदाजांसमोर धावा करता आल्या नाही. भारतीय संघाने या गोष्टीचा योग्यरीत्या फायदा घेतला. तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा डाव लवकर कोसळला. कारण इंग्लंड संघाच्या फलंदाजांना आपल्या रक्षात्मक खेळावर विश्वास नव्हता.’

इंग्लिश फलंदाजांना फिरकी गोलंदाजांसमोर आले अपयश

इयान चॅपेल यांनी पुढे लिहले की, ‘जेव्हा फिरकी गोलंदाजांचा सामना करायचा होता; तेव्हा इंग्लिश फलंदाजांना आपल्या रक्षात्मक फलंदाजीवर विश्वास नव्हता. त्यामुळे इंग्लिश फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. क्रिजमध्ये थोड पुढे येऊन खेळण्याएवजी ते स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होते. पुढे येऊन शॉट खेळल्यास फलंदाजाकडे हव तिथे शॉट खेळण्याची संधी असते. हे असे कौशल्य आहे, जे सुरूवातीलाच फलंदाजांना शिकवले जाते. आधीच मन बनवून खेळले गेलेले शॉट हे विश्वसनीय पद्धतीपेक्षा श्रेष्ठ कसे काय असू शकतात?’

महत्त्वाच्या बातम्या-

बड्डेच्या दिवशीच क्रिकेटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, कोरोना झाल्यामुळे करावं लागलं दाखल

कुणी तरी येणार येणार गं! युवराज सिंग लवकरच होणार बाबा? चर्चेला आले उधाण

फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या रहाणेसाठी धावून आले भारतीय दिग्गज; म्हणाले, “त्याच्या योगदानाला दुर्लक्षित…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---