जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघ आपापल्या मागील मालिका जिंकल्यामुळे ही मालिका देखील चुरशीची होईल, अशी चिन्हे आहेत. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या मालिकेविषयी आपली मते मांडली आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज इयान चॅपेल यांनीही आता या चर्चेत उडी घेतली आहे. त्यांनी भारतीय संघ खूप मजबूत असल्याचे सांगत इंग्लंड संघाची कमजोरी सांगितली आहे.
“इंग्लंडची वरची फळी कमजोर”
आपल्या स्तंभात भारत विरुद्ध इंग्लंडच्या आगामी मालिकेविषयी लिहिताना चॅपेल म्हणाले, “भलेही इंग्लंडने नुकतेच श्रीलंकाला २-० ने क्लिन स्वीप केले आहे. परंतु त्यांची वरची फळी जास्त भक्कम नसल्याने भारतीय संघाचे पारडे जड आहे. अशात प्रमुख खेळाडू बेन स्टोक्स याची उपस्थिती इंग्लंड संघासाठी खूप महत्त्वपुर्ण असणार आहे. स्टोक्स आणि हार्दिक पंड्या यांच्यातील अष्टपैलू क्षमता सारखीच आहे. तरीही स्टोक्स हार्दिकपेक्षा थोडा सरस आहे.”
चॅपेलनी बर्न्स आणि सिब्लेच्या शैलीवर केले प्रश्न
पुढे चॅपेल यांनी म्हटले की, “स्टोक्सबरोबर सलामीवीर फलंदाज रॉरी बर्न्स याचेही संघात पुनरागमन झाले आहे. पण इंग्लंडच्या वरची फळीतील फलंदाजांच्या प्रदर्शनावर सर्वकाही अवलंबून असेल. सलामीवीर डॉम सिब्लेमध्ये संघाला चांगली सुरुवात करण्याची क्षमता आहे. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर तो दिग्गज गोलंदाजांपुढे नैसर्गिक फलंदाजी करताना दिसत नाही. बर्न्सदेखील सिब्लेसारखाच आहे. त्यामुळे जर सलामीवीर सिब्ले आणि बर्न्स फ्लॉप ठरले. तर कर्णधार जो रूटवर खूप दबाव निर्माण होईल. यामुळे इंग्लंड संघाच्या अडचणी वाढू शकतात.”
“याबरोबरच फलंदाज जॅक क्राउले हा भारतीय सलामीवीर शुबमन गिलप्रमाणे प्रतिभाशाली फलंदाज आहे. परंतु श्रीलंकाविरुद्धच्या त्याच्या खराब फॉर्ममुळे सध्या संघाला त्याची चिंता वाटत आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर आपल्या फॉर्मवर काम करावे लागणार आहे,” असे शेवटी त्यांनी सांगितले.
लवकरच भिडणार भारत आणि इंग्लंड संघ
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दौऱ्याची सुरुवात ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार आहे. तर अखेरचे दोन सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
जाळ अन् धूर सोबतच! टी१० लीगमध्ये अवघ्या २६ चेंडूत फलंदाजाने चोपल्या ८९ धावा अन् खेचले १२ षटकार
बापरे! आर अश्विनची पत्नी प्रितीने दिली होती नेहराजींना शिवी? स्क्रीनशॉट होतोय व्हायरल
ही कसली भानगड! २८ वर्षांचा दीपक चाहर झाला थेट ४८ वर्षांचा, बहिणीने केलं ट्रोल