पुणे: आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत आयबीएम संघाने बीएमसी सॉफ्टवेअर संघाचा तर मर्क्स संघाने सॉफ्टहार्ड संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मौदानावर झालेल्या सामन्यात सुशिल शर्माच्या 39 धावांच्या जोरावर आयबीएम संघाने बीएमसी सॉफ्टवेअर संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना विजय कुमार, धरमवीर सिंग व विनय पालुरू यांच्या अचूक गोलंदाजीपुढे बीएमसी सॉफ्टवेअर संघ 19.1 षटकात सर्वबाद 116 धावांत गारद झाला. 116 धावांचे लक्ष सुशिल शर्माच्या 39, जावेद सलीमच्या 30 व किरण लगडच्या 21 धावांसह आयबीएम संघाने 16.2 षटकात 4 बाद 119 धावांसह पुर्ण करत विजय मिळवला. सुशिल शर्मा सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत राघव त्रिवेदीच्या दमदार अष्टपैलु कामगिरीच्या बळावर मर्क्स संघाने सॉफ्टहार्ड संघाचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात 39 चेंडूत 87 धावा व 25 धावांत 2 गडी बाद करणारा राघव त्रिवेदी सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
बीएमसी सॉफ्टवेअर- 19.1 षटकात सर्वबाद 116 धावा(शिरीष सोनावणे 27(24), विजय कुमार 3-13, धरमवीर सिंग 2-27, विनय पालुरू 2-21) पराभूत वि आयबीएम- 16.2 षटकात 4 बाद 119 धावा(सुशिल शर्मा 39(37), जावेद सलीम 30(33), किरण लगड 21(8), राहूल पिचे 2-19) सामनावीर- सुशिल शर्मा
आयबीएम संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.
सॉफ्टहार्ड- 20 षटकात 5 बाद 179 धावा(विराज काकडे 30(24), रोहन खलाटे 35(33), अमित कदम 58(39), श्रीकांत कासार 21(14), केतन पासलकर 21(9), राघव त्रिवेदी 2-25) पराभूत वि मर्क्स – 19.5 षटकात 5 बाद 180 धावा(राघव त्रिवेदी 87(39), प्रसाद गिरकर 21(16), राकेश पिल्ले 31(22), पराग सराफ 2-26) सामनावीर- राघव त्रिवेदी
मर्क्स संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.