वनडे विश्वचषकात मंगळवारी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी आक्रमन अफगाणिस्तानच्या धावांवर लगाम लावू शकले नाही. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा विश्वचषक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 5 विकेट्सच्या नुकसानावर 291 धावांची खेळी केली. शतकी खेळी करणाऱ्या इब्राहिम जादरान याने शतकासाठी सचिन तेंडुलकचा सल्ला महत्वाचा ठरला, असे सांगितले.
उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक अफगाणिस्तानने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित 50 षटकांमध्ये अपगाणिस्तानने 5 विकेट्सच्या नुकसानावर 291 धावांची खेळी केली. सलामीवीर इब्राहिम जादरान याने 143 चेंडूत 129 धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्याचसोबत शेवटच्या षटकांमध्ये राशिद खान याने अवघ्या 18 चेंडूत 35 धावांची सर्वोत्तम खेळी केली आणि संघाची धावसंख्या 291 धावांपर्यंत पोहोचवली. या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे सोमवारी (6 नोव्हेंबर) भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने अफगाणिस्तान संघाला भेट दिली होती. यावेळी सचिनने खेळाडूंना मार्गदर्शन देखील केले.
ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी आक्रमण जगात सर्वोत्तम मानले जाते. पण इब्राहिने याच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना नाबाद 129 धावा कुटल्या. या खेळीनंतर नक्कीच त्याचा आत्मविश्वास अझून वाढला आहे. अफगाणिस्तानचा डाव संपल्यानंतर इब्राहिम म्हणाला, “माझ्यासाठी ही मोठी कामगिरी आहे आणि हा चांगला अनुभव आहे. मला अजून शतके करायची आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात थोडक्यात माझे शतक हुकले होते. पण लवकरच शतक करणार, अशी भावना तयार झाली होती. मी प्रशिक्षकांनाही याविषयी सांगितले होते.”
इब्राहिने या सामन्यातील शतकासाठी एकप्रकारे सचिन तेंडुलकर यालाही योगदान दिले. तो म्हणाला, “मी काल सचिन तेंडुलकर यांना काल भेटलो. त्यांचे मार्गदर्शाची मदत झाली. सचिनने 24 वर्ष क्रिकेट खेलले आहे आणि आपला अनुभव आमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.”
Sachin Tendulkar pays the Afghanistan camp a visit ????#CWC23 pic.twitter.com/bMd165kFBs
— ICC (@ICC) November 6, 2023
(Ibrahim Zadran thanked Sachin Tendulkar after his century against Australia)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, ऍडम झम्पा.
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक.
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकप 2023मध्ये कुणीच नाही रोहितच्या आसपास, बनला ‘असा’ भीमपराक्रम करणारा पहिलाच भारतीय
ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी 3 खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट, कोण आहे तो नशीबवान भारतीय?