आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 अवघ्या काही आठवड्यांवर आला आहे. 16 ऑक्टोबर रोजी विश्वचषक सुरू होईल. भारताला त्यांचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियात खेळली जाणारी ही स्पर्धा जो संघ जिंकले त्याला बक्षीस म्हणून मोठी रक्कम दिली जाणार आहे. भारतीय चलनानुसार यावर्षीच्या विश्वचषकात तब्बल 45.67 कोटी रुपयांची बक्षीसे वाटली जाणार आहेत.
माहितीनुसार यावर्षीचा टी-20 विश्वचषक जिंकणारा संघ तब्बर 13 कोटी पाच लाख आणि 25 हजार रुपयांचे बक्षीस देखील मिळवणार आहे. उपविजेत्या संघाला 6 कोटी 52 लाख 54 हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आयसीसीने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचणाऱ्या संघाला 3 कोटी 26 लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच सुपर 12 फेरीतून बाहेर होणाऱ्या 8 संघांना प्रत्येकी 57 लाख रुपये दिले जाणार आहे. तसेच सुपर 12 फेरीत प्रत्येक विजयासाठी प्रत्येकी 33 लाख रुपये दिले जाणार आहेत.
टी-20 विश्वचषकात दिली जाणारी बक्षीसे –
विजेता संघ – 1.6 मिलियन डॉलर (जवळपास 13 कोटी रुपये)
उपविजेता संघ – 0.8 मिलियन डॉलर (जवळपास 6.5 कोटी रुपये)
उपांत्य सामन्यात पराभूत होणारे संघ – 0.4 मिलियन डॉलर (जवळपास 3.26 कोटी रुपये)
सुपर 12 फेरीत प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघ – 40 हजार डॉलर (जवळपास 33.62 लाख रुपये)
सुपर 12 फेरीतून मधून बाहेर होणारा प्रत्येक संघ – 70 हजार डॉलर (जवळपास 57.09 लाख रुपये)
पहल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ – 40 हजार डॉलर (जवळपास 33.62 लाख रुपये)
पहिल्या फेरीतून बाहेर होनारा प्रत्येक संघ – 40 हजार डॉलर (जवळपास 33.62 लाख रुपये)
https://twitter.com/ICC/status/1575742458901716994?s=20&t=Pcm8bM9hiSNQUv-2CrCaaQ
विश्वचषक स्पर्धा 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून पहिल्यां फेरीत श्रीलंका संघासह एकूण 8 संघ खेळतील. या 8 संघांपैकी चार संघ सुपर 12 फेरीत पोहोचतील. सुपर 12 फेरी 22 ऑक्टोबरपासून खेळली जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी चाहते उस्तक आहेत. मागच्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सच्या अंतराने पराभूत केले होते. आता यावर्षी भारतीय संघ या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शार्दुल ठाकुर आणि पृथ्वी शॉ टी20 संघात इन, अजिंक्य रहाणे करणार नेतृत्व
क्रिकेटविश्वास पसरली शोककळा! पाकिस्तानी क्रिकेटपटूने वयाच्या 36 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास





