आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2024 चा सर्वोत्तम टी20 संघ जाहीर केला आहे. या संघात एकूण चार भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड झाली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी 2024 चा टी20 विश्वचषक जिंकला होता. संघात सर्वाधिक चार खेळाडू भारताचेच आहेत. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.
या संघात एकूण भारताच्या चार, तर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यासंघातील प्रत्येकी एक-एक खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
या संघात रोहित हा केवळ कर्णधार नाही, तर तो सलामीवीर देखील आहे. गेल्या वर्षी त्याने 11 टी20 सामन्यांमध्ये 42 च्या सरासरीने आणि 160+ च्या स्ट्राईक रेटने 378 धावा केल्या. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 11 वर्षांचा आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो सध्या भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. तर, बुमराहने 2024 मध्ये 8 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 8.26 च्या सरासरीने 15 विकेट्स घेतल्या. बुमराहने टी20 विश्वचषकात हे सर्व सामने खेळले आणि भारताला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता.
🚨 ICC ANNOUNCED “MEN’S T20I TEAM OF THE YEAR” 2024 🚨
– Rohit Sharma is the Captain of the side..!!!! 🌟 pic.twitter.com/fvIqSWxYjY
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 25, 2025
आयसीसी टी20 संघ 2024 : रोहित शर्मा (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, फिल साल्ट, बाबर आझम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सिकंदर रझा, हार्दिक पांड्या, रशीद खान, वनिंदू हसरंगा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
हेही वाचा-
पाकिस्तानच्या हरिस रौफचा घमंड तुटणार, अर्शदीपकडे ही कामगिरी करण्याची उत्तम संधी
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी हा खेळाडू ‘X’ फॅक्टर ठरणार, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी
38 वर्षाय खेळाडूनं रचला पकिस्तान क्रिकेटमध्ये नवा इतिहास, अशी कमागिरी करणारा प्रथमच!