आयसीसीने 2024 मधील सर्वोत्तम कसेटी संघाची घोषणा केली आहे. या संघात एकूण भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. संघात सर्वाधिक चार खेळाडू इंग्लंडचे आहेत. यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या भारतीय खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे.
या संघात एकूण इंग्लंडच्या चार, भारताच्या तीन, न्यूझीलंडच्या दोन तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळालं आहे. या संघाच्या कर्णधारपदी पॅट कमिन्सची निवड झाली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून इंग्लंडच्या जेमी स्मिथला निवडले आहे. सलामीची जबाबदारी यशस्वी जयस्वाल आणि इंग्लंडच्या बेन डकेटकडे आहे. तर फिरकीची जबाबदारी अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे आहे.
आयसीसी टेस्ट टीम ऑफ द इयर 2024
यशस्वी जयस्वाल, बेन डकेट, केन विल्यमसन, जो रुट, हॅरी ब्रुक, कामिंदू मेंडिस, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, पॅट कमिन्स (कर्णधार), मॅट हेन्री, जसप्रीत बुमराह
ICC TEST TEAM OF THE YEAR 2024. ⭐ pic.twitter.com/kudYUgFIim
— Johns. (@CricCrazyJohns) January 24, 2025
संघाची वेगवान गोलंदाजी मजबूत दिसत आहे. ज्यामध्ये कर्णधार पॅट कमिन्स, याॅर्कर किंग जसप्रीत बुमराह आणि न्यूझीलंडचा अनुभवी मॅट हेन्नीचा समावेश आहे. फॅब -4 पैकी दोन खेळाडूंना (जो रुट आणि केन विल्यमसन) देखील संघात स्थान मिळाले आहे.
हेही वाचा-
आयसीसीचा महिला वनडे संघ जाहीर, या 2 भारतीय खेळाडूंना मिळालं स्थान
रणजी सामन्यात गोंधळ, खराब अंपायरिंगमुळे अजिंक्य रहाणे भडकला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आयसीसीचा वनडे संघ जाहीर, एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही