आयसीसीने आज (29 जानेवारी) सातव्या पुरुष टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहिर केले आहे. हा विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या दरम्यान खेळला जाणार आहे.
या विश्वचषकात 12 संघ सहभागी होणार आहेत. यातील 8 संघांना 2018आयसीसी टी20च्या क्रमवारीनुसार थेट प्रवेश मिळाला आहे. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, विंडीज, इंग्लंड, न्यूझीलंड, अफगानिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा सुपर 12मध्ये सहभाग आहे. तर बाकीचे चार संघ पात्रता फेरीतून ठरवले जाणार आहेत.
या स्पर्धेसाठी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यातील पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, विंडीज, न्यूझीलंड आणि पात्रता फेरीतील दोन संघ असणार आहेत. तर दुसऱ्या गटात भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगानिस्तान आणि पात्रता फेरीतील दोन संघ असणार आहेत.
विंडीज आणि बांगलादेश या संघांची क्रमवारी कमी असल्याने त्यांना पात्रता फेरीतील सामने खेळावे लागणार आहे. हे सामने 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान सहा संघांमध्ये होणार आहेत. यातील अंतिम चार संघ सुपर 12च्या सामन्यांसाठी निवडले जाणार आहेत.
या स्पर्धेचा सुपर 12चा पहिला सामना 24 ऑक्टोबर,2020ला यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान असा सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. तर अफगानिस्तान प्रथमच या स्पर्धेत खेळत आहे.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना 11 नोव्हेंबरला सिडनी आणि दुसरा सामना 12 नोव्हेंबरला एडलेड येथे खेळला जाणार आहे. तर अंतिम सामना मेलबर्न येथे 15 नोव्हेंबरला रंगणार आहे.
या स्पर्धेच्या साखळी फेरीतील भारताचे सामने-
24 ऑक्टोबर, 2020 – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (पर्थ स्टेडियम, पर्थ)
29 ऑक्टोबर, 2020 – भारत विरुद्ध पात्रता फेरीतील ए 2 संघ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न)
1 नोव्हेंबर, 2020 – भारत विरुद्ध इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न)
5 नोव्हेंबर, 2020 – भारत विरुद्ध पात्रता फेरीतील बी 1 संघ (एडलेड ओव्हल, एडलेड)
8 नोव्हेंबर, 2020 – भारत विरुद्ध अफगानिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी)
The #T20WorldCup fixtures were announced today. Mark your calendars!
FULL LIST ⬇️https://t.co/A0ZzCvQgL3 pic.twitter.com/yMrxZcsEtn
— ICC (@ICC) January 29, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–तब्बल १६ महिन्यांनी किंग कोहली ठरला या गोष्टीत दुर्दैवी
–हिटमॅन रोहित शर्मासाठी ३१ जानेवारी ठरणार कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण
–आयसीसी महिला टी२० विश्वचषक२०२० च्या वेळापत्रकाची घोषणा