आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) बुधवारी(27 जानेवारी) महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण वर्षातील प्रत्येक महिन्यात तिन्ही क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूचा सन्मान केला जाणार आहे.
या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येणार आहे. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येईल.
याबाबत आयसीसीचे सरव्यवस्थापक जेफ अलार्डिस म्हणाले, ‘महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार हा चाहत्यांशी संपर्क साधण्याचा आणि वर्षभरात त्यांच्या आवडत्या खेळाडूंची कामगिरी साजरा करण्याचा एक चांगला मार्ग आहे. यामुळे पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या मैदानावरील कामगिरीचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळेल. जानेवारी महिन्यातच भरपूर प्रमाणात या पुरस्कारासाठी उमेदवार आहेत.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका अशा अनेक स्पर्धा जानेवारीमध्ये पार पडल्या आहेत.
अशा पद्धतीने दिले जातील पुरस्कार
आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतील.
व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करेल. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतील. यानंतर पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांचा 90 टक्के आणि चाहत्यांच्या मतांचा 10 टक्के विचार केला जाईल. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी संघातून बाहेर होणार होता का? अजिंक्य रहाणेने उलगडले सत्य
रिषभ पंतने सांगितले, ब्रिस्बेन कसोटीत विजयी फटका मारल्यानंतर ‘अशा’ होत्या भावना
ट्रेंडिंग लेख –
‘ड्युरासेल’ म्हणून ओळखले जाणारे कर्टनी वॉल्श
अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर