आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी (२९ एप्रिल) भारतीय व्यावसायिक दीपक अगरवालवर २ वर्षांची बंदी घातली आहे. तो संयुक्त अरब अमिराती येथे २०१८मध्ये झालेल्या टी१०लीगमधील एका फ्रंचायझी संघाचा मालक होता.
अगरवालने भ्रष्टाचार विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा स्विकार केल्यानंतर पुढील तपासणी करण्यात आली. त्यामुळे त्याच्यावर लावण्यात आलेल्या २ वर्षांच्या बंदीमध्ये ६ महिन्यांची निलंबणाची शिक्षा आहे.
अगरवाल मागील काही काळासाठी टी१० लीगमधील फ्रंचायझी संघ सिंधीजचा (Sindhis) मालक होता. त्यांना २०१८ च्या टप्प्यात भागीदार म्हणून त्यांच्यावर संहिता अंतर्गत शुल्क आकारले गेले. अग्रवाल अनोळखी ‘मिस्टर एक्स’ चे पुरावे मिटविण्याच्या आरोपात सहभागी असल्याचेही समोर आले आहे. यामध्येही अगरवालला सहभागी म्हणून सांगण्यात आले आले.
आयसीसीने दिलेल्या माहितीप्रमाणे, “अगरवालने ‘मिस्टर एक्स’ला एकमेकांमध्ये झालेल्या संवादादरम्यानचे सर्व मेसेज डिलीट करण्यास सांगितले होते. तसेच एसीयूच्या तपासणीत सामील होण्यापूर्वी त्याने त्याचा नंबरही डिलीट केला होता.”
आचार संहितेच्या २.४.७ कलमानुसार अगरवालवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्याने सुरु असलेल्या तपासणीमध्ये कोणतेही कागदपत्रे नष्ट करणे, इतर गोष्टी लपविणे किंवा छेडछाड करण्याशी संबंधित आहे.
आयसीसीचे मुख्य अध्यक्ष ऍलेक्स मार्शल (Alex Marshall) म्हणाले की, “अगरवालने आमच्या तपासणीमध्ये अनेकवेळा समस्या निर्माण करण्याचा आणि उशिर करण्याचा प्रयत्न केला. असे केवळ एक वेळा नाहीतर अनेकवेळा झाले आहे. तरी त्याने या गोष्टी स्विकार केल्या आहेत. तसेच इतर सहभागींबद्दल चालू असलेल्या चर्चेसंबंधीत मदत सुरु ठेवली आहे. त्यामुळे त्याच्या शिक्षेवर फरक पडला आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रीयन खेळाडू
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू
-चहलने रोहितला दिल्या अशा शुभेच्छा, रितीकाही झाली नाराज