भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा गेल्या दशकात भारतीय क्रिकेटला मिळालेली अमुल्य गोष्ट आहे.
आपल्या कर्णधार म्हणून पहिल्याच स्पर्धेची विजयी सुरवात करणाऱ्या धोनीनी नंतरच्या आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दित भारतीय क्रिकेट संघाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
आजच्याच दिवशी म्हणजेच 23 जून 2013 इंग्लंडला अटातटीच्या सामन्यात 6 धावांनी पराभूत करत चॅम्पीयन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते.
या विजयाबरोबरच एमएस धोनी आयसीसीने आयोजीत केलेल्या सर्व स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा जागातिल पहिला कर्णधार बनला.
धोनीच्या कर्णधार पदाच्या कारकिर्दित भारतीय संघाने आयसीसीच्या सर्व स्पर्धांचे विजेतेपद मिळवले आहे. यामध्ये 2007 सालचा टी-20 विश्वचषक, 2011 चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 साली इंग्लंडमध्ये झालेली चॅम्पीयन्स ट्रॉफीचा समावेश आहे.
हा एकदिवसीय सामना पावसाच्या व्यत्ययामुळे हा वीस षटकांचा घेण्यात आला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 बाद 129 धावा केल्या होत्या.
130 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ 124 धावांमध्ये सर्वबाद झाला.
शेवटच्या18 बॉलमध्ये इंग्लंडला विजयासाठी 20 धावांची गरज होती आणि चार फलंदाज शिल्लक असतानाही धोनी ब्रिगेडसमोर इंग्लंडचा निभाव लागला नाही.
या सामन्यात रविंद्र जडेजाने फलंदाजी करताना 33 धावा आणि इयान बेल आणि जॉस बटलर या दोन महत्वाच्या फंलंदाजांचा बळी घेत भारताच्या विजेतेपदामध्ये मोलाची भूमिका बजावली होती.
या कामगिरीसाठी जडेजाला सामनाविराचा पुरस्कार दिला होता.
2013 च्या चॅम्पीयन्स ट्रॉफीनंतर 2017 च्या चॅम्पीयन्स ट्रॉफीतही भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण यामध्ये भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला होता.
महत्वाच्या बातम्या-
-कबड्डीवरुन सेहवाग आणि पाकिस्तानी चाहत्यांचे ट्विटरवर घमासान!
–कबड्डी मास्टर्स 2018: दुबईच्या वाळवंटात भारताचा पाकिस्तानविरुद्ध गुणांचा पाऊस