---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार? स्पर्धेचे ‘कट-ऑफ’ डेट समोर

On: सोमवार, जानेवारी 6, 2025 1:26 PM
---Advertisement---

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. अशा स्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत आहे की, बीसीसीआय या आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी करणार? अलीकडेच टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळताना दिसली. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीकडे जात नव्हते. मीडिया रिपोर्ट्सनुसार आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ सादर करण्याची शेवटची तारीख समोर आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, सर्व संघांना 12 जानेवारीपर्यंत 15 सदस्यीय तात्पुरती (जे बदलाच्या अधीन आहे) संघाची घोषणा करावी लागेल. तथापि, संघ 13 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या संघात बदल करू शकतात. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

अहवालात आयसीसीच्या एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, “सर्व संघांना 12 जानेवारीपर्यंत त्यांची तात्पुरते तरी संघ जाहीर करावे लागतील, तसेच जाहीर केलेल्या संघात 13 फेब्रुवारीपर्यंत बदल केले जाऊ शकतात. आता अश्या स्थितीत संघांची घोषणा कधी करणार हे त्या त्या बोर्डावर अवलंबून असेल. 

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया घरच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 22 जानेवारी पासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये पहिले टी20 सामने खेळवले जातील. त्यानंतर 6 फेब्रुवारीपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची एकदिवसीय मालिका असेल. ज्याद्वारे संघ स्पर्धेसाठी तयारी करू शकेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीची शेवटची आवृत्ती 2017 मध्ये खेळली गेली होती. ज्यात टीम इंडियाला विजेतेपदाच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत यावेळी टीम इंडिया टूर्नामेंट जिंकेल अशी अपेक्षा चाहत्यांना असेल.

हेही वाचा-

काय सांगता! भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच अडकला, परतीचे तिकिट मिळेना; मजेशीर कारण जाणून घ्या
‘त्याला माजी खेळाडूंशी…’, आऊट ऑफ फाॅर्ममध्ये असलेल्या ‘विराट’ला इरफान पठाणने सुनावले
“यामुळे भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली”, सौरभ गांगुलीने कोणाला दोष दिला?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---