जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जूनपासून सुरू होत असून संपूर्ण क्रिकेटविश्व या सामन्यासाठी आतुर झाले आहे. भारत आणि न्यूझीलंड संघ पहिल्याच अजिंक्यपद स्पर्धेवर नाव कोरून इतिहास घडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. या सामन्यासाठी दोन्ही संघ इंग्लंडमध्ये पोहोचले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. तत्पुर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले आहे की, पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला तरीही फॉलोऑनच्या नियमांमध्ये कसलाही बदल केला जाणार नाही.
क्रिकबझने सांगितल्यानुसार, आयसीसीने हे स्पष्टीकरण भारतीय आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यातील अतिरिक्त दिवस विचारात घेऊन दिले आहे. आयसीसीच्या नियमांनुसार प्रथम फलंदाजी करण्याऱ्या संघाला 200 धावांची आघाडी मिळाल्यास विरुद्ध संघाला पुन्हा फलंदाजीकरिता पाचारण करता येऊ शकते. सामन्यात दिवसांची संख्या जितकी कमी असेल, त्यानुसार धावांची बढत देखील कमी-कमी होत जाईल. 3 किंवा 4 दिवसांच्या सामन्यात 150 धावा, 2 दिवसांच्या सामन्यात 100 आणि 1 दिवस असलेल्या सामन्यांत फॉलोऑन करीता 75 धावांची आघाडी आवश्यक असेल.
पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी खेळ झाला नाही तर, 14.1 च्या नियमानुसार खेळातील शिल्लक दिवसांच्या संख्येनुसार नियम निश्चित होईल. ज्या दिवशी सामना सुरु होईल, त्या दिवसाला पूर्ण दिवस समजले जाईल. त्या दिवशी कोणत्याही वेळी सामना सुरु झाला तरीही पहिले षटक सुरु होताच तो संपूर्ण दिवस ग्राह्य धरण्यात येईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
आयसीसीने याआधीही अंतिम सामन्यासाठी नियमावली जाहीर केली होती. त्यामध्ये असे नमूद करण्यात आले होते की, अतिरिक्त दिवसाचा उपयोग करायचा किंवा नाही याचा अंतिम निर्णय पाचव्या दिवशीच्या शेवटच्या तासाचा खेळ सुरू झाल्यावर घेण्यात येईल. याव्यतिरिक्त ग्रेड-१ ड्यूक चेंडूचा वापर, शॉर्ट रन, प्लेयर्स रिव्ह्यू, डीआरएस रिव्ह्यू या नियमांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो भारताचा थ्रीडी खेळाडू, त्याला संघाबाहेर करणं कठीण’; पाकिस्तानी खेळाडूकडून स्तुती
माजी ऑसी दिग्गजाने निवडले जगातील ५ सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बुमराहला नाही दिली जागा
संधीची प्रतिक्षा! इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळालेला गोलंदाज म्हणतोय, ‘आता श्रीलंका दौऱ्याची आस’