---Advertisement---

आयसीसीच्या ट्विटर अकाऊंटवर रंगला भारत-पाकिस्तानचा सामना, पाहा कोणी मारली बाजी 

---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याचा घडीचा सर्वात उत्कृष्ट खेळाडू आहे. नुकतेच आयसीसीने जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम कसोटी, वनडे आणि टी-20 संघात विराट कोहलीचा समावेश केला आहे. जगातील तो एक मात्र असा खेळाडू आहे, ज्याचा आयसीसीने जाहीर केलेल्या तीन संघात समावेश आहे. त्याचबरोबर आयसीसीने त्याला दशकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली आहे. विराट कोहली तिन्ही फॉरमॅट 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच वनडे सर्वाधिक जास्त शतके करणारा सचिन तेंडुलकरनंतर जगातील तो दुसरा खेळाडू आहे.

आयसीसीने ट्विटर हॅन्डलवरून क्रिकेट चाहत्यांना एक प्रश्न विचारला होता. आयसीसीने विचारले होते की, जगातील सर्वोत्तम कर्णधार खेळाडू कोण आहे? आणि यासाठी आयसीसीने चार पर्याय दिले होते. ज्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिका संघाचा माजी खेळाडू एबी डिविलियर्स, ऑस्ट्रेलिया संघाची माजी महिला खेळाडू मेग लॅनिंग आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू इम्रान खान यांच्या नावांचा समावेश होता.

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी चाहत्यांकडे 24 तासाचा कालावधी होता. त्यानंतर जो निकाल आला त्यावरून सगळे अवाक् झाले कारण यामध्ये इम्रान खान याने बाजी मारली होती. ज्याने 1992 साली पाकिस्तान संघाला वनडे विश्वचषक जिंकून दिला होता. त्यामुळे त्याला 47.3 टक्के मते पडली होती. विराट कोहलीला इम्रान खान पेक्षा कमी मते मिळाली आहेत. विराट कोहलीला 47.3 टक्के मते मिळाली आहेत. त्याच्यापेक्षा कमी मते एबी डिविलियर्सला मिळाली. त्याला 46.2 टक्के मते प्राप्त झाली. त्याचबरोबर मेग लॅनिंग हिला 0.5 टक्के मते मिळाली.

यावरून हे निश्चित झाले की विराट कोहलीला लोक खूप पसंत करतात. मात्र इम्रान खानला पसंत करणार्‍या लोकांची संख्या कमी नाही. इम्रान खानने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी 21 वर्ष क्रिकेट खेळले आहे. या दरम्यान त्याने 88 कसोटी आणि 175 वनडे सामने खेळले आहेत. तो एक उत्तम अष्टपैलू खेळाडू होता. त्याने कसोटीत 3807 धावा आणि 362 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 4844 धावा आणि 182 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतके केली आहेत आणि वनडेत 1 शतक झळकवले आहे.

महत्वाच्या बातम्या:

खेळाडूंच्या दुखापतींना आयपीएल जबाबदार, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचे परखड मत

रिषभ पंतने ४ महिन्यात १० किलो वजन केले कमी; प्रशिक्षकांनी केला उलगडा  

विराट कोहलीला मुलगी झाल्याचे कळताच रितेश देशमुख यांनी दिली अशी प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---