आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) नेहमीच प्रयत्नशील असते. येणाऱ्या काळात आयसीसी नवीन नियमांचा अवलंब करणार आहे. आयसीसीने टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या संघाच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत १६ संघ या चुरसीच्या स्पर्धेत सहभाग घेत होते. परंतु आता २० संघांना सहभागी होता येणार आहे. याची अंमलबजावणी येत्या २०२४ विश्वचषक स्पर्धेपासून होणार आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, आयसीसी गेल्या काही वर्षांपासून संघांमध्ये वाढ करण्याच्या विचारात आहे. आयसीसीने यापूर्वी देखील महिला क्रिकेट स्पर्धेत संघाची संख्या वाढवण्याच्या योजनेची पुष्टी केली होती. २०२४ मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी २० संघांना ५-५च्या ४ गटांमध्ये विभागले जाईल. तसेच प्रत्येक गटात २ बलाढ्य संघाचा समावेश असू शकतो.
वनडे विश्वचषक स्पर्धेत देखील संघाच्या संख्येत होणार वाढ
आयसीसीने कसोटी क्रिकेटकडे लोकांचे आकर्षण कमी होऊ लागले होते म्हणून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच वनडे क्रिकेटमध्ये देखील संघाची संख्या वाढवण्यात येणार आहे. वनडे क्रिकेटला जास्तीत जास्त देशांपर्यंत पोहचवण्यासाठी आयसीसी प्रयत्न करत आहे. त्यामुळे २०२३ नंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत १० ऐवजी १४ संघाना प्रवेश दिला जाणार आहे. २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत १० संघांनी सहभाग घेतला होता. तरीदेखील झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघांना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे या संघांनी नैराश्य व्यक्त केले होते.
२०१९ विश्वचषकात १० संघांनी घेतला होता प्रवेश
गेल्या काही वर्षांपासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेत संघाची संख्या कमीच होत चालली आहे. २००७ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. यात १० फुल मेंबर्स आणि ६ असोसिएट मेंबर्स होते. त्यानंतर २०११ आणि २०१५ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत १४ संघांनी सहभाग घेतला होता. तसेच २०१९ मध्ये ही संख्या १० झाली होती. यामागे कारण असे होते की, दुर्बल संघांच्या समावेशामुळे ब्रॉडकास्टर्सना अधिक एकतर्फी सामने स्पर्धेत घ्यावेसे वाटले नाहीत. म्हणूनच त्यांना हे स्वरुप लहान करायचे होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! वृद्धिमान साहावर कोरोनाचा ‘डबल अटॅक’, दुसऱ्यांदा आढळला पॉझिटिव्ह
कसोटी क्रमवारी: भारतीय संघाचे स्थान धोक्यात; ‘असं’ झालं तर न्यूझीलंड होऊ शकतो अव्वलस्थानी विराजमान
भारतीय महिला क्रिकेटरसोबत झाला होता वाद, आता त्याच संघाचे बनलेत ‘महागुरु’; जाणून घ्या त्यांच्याविषयी