आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी 2004पासून क्रिकेटपटूंना त्यांच्या कामगिरीसाठी पुरस्कार देते. वर्षातील वनडे, कसोटी व आंतरराष्ट्रीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 2019 या वर्षीचा आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला घोषित झाला होता.
2004 पासून हा पुरस्कार मिळवणारा तो एकूण 14 वा क्रिकेटपटू ठरला आहे. तर इंग्लंडचा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि जोनाथन ट्रॉट यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
स्टोक्सने 2019 चा विश्वचषक इंग्लंडला जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. तसेच या संपूर्ण वर्षभरात त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याचा 2019मध्ये पार पडलेल्या ऍशेस मालिकेतही इंग्लंडला बरोबरी साधून देण्यात मोलाचा वाटा होता.
आजपर्यंत भारतीय क्रिकेटपटूंमध्ये राहुल द्रविड (2004), सचिन तेंडूलकर (2010), आर अश्विन (2016) व विराट कोहली (2017 व 2018 ) यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
विराट कोहली व रिकी पाॅटींग हे केवळ दोन असे क्रिकेटपटू आहेत ज्यांना हा पुरस्कार २ वेळा तेही सलग दोन वर्ष मिळाला आहे. मिचेल जाॅन्सनला 2009 व 2014 साली तो पुरस्कार मिळाला होता.
हे आहेत 2004 ते 2019 पर्यंतचे आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्काराचे विजेते:
2004 – राहुल द्रविड
2005 – जॅक कॅलिस/ अँड्र्यू फ्लिंटॉफ
2006 – रिकी पॉन्टिंग
2007 – रिकी पॉन्टिंग
2008- शिवनारायण चंद्रपॉल
2009 – मिशेल जॉन्सन
2010 – सचिन तेंडुलकर
2011 – जोनाथन ट्रॉट
2012 – कुमार संगकारा
2013 – मायकल क्लार्क
2014 – मिशेल जॉन्सन
2015 – स्टीव्ह स्मिथ
2016 – आर अश्विन
2017 – विराट कोहली
2018 – विराट कोहली
2019 – बेन स्टोक्स
ट्रेंडिंग घडामोडी –
षटकार- चौकार मारले म्हणून एमएस धोनी झाला होता नाराज
भारतीय खेळाडू देशासाठी नाही तर स्वत: साठी खेळतात
टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा






