इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 विश्वचषकातील सामन्यांमध्ये सातत्याने पावसाचा व्यत्यय येत आहे. याआधीच पावसामुळे आत्तापर्यंत 3 सामने रद्द झाले आहेत. त्यामुळे आयसीसीकडे राखीव दिवसाची मागणी होत आहे. पण आयसीसीचे सीईओ डेव रिचर्डसन यांनी साखळी फेरीत राखीव दिवस न ठेवण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.
रिचर्डसन म्हणाले, ‘आयसीसी विश्वचषकात जर प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला असता तर स्पर्धा खूप मोठी झाली असती आणि व्यावहारिकपणे त्याचा अवलंब करणे अत्यंत कठिण गेले असते.’
‘याचा परिणाम खेळपट्टी तयार करणे, संघाच्या रिकव्हरी आणि प्रवासाच्या दिवसावर तसेच महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांवर जे अनेक तासांचा प्रवास करुन सामना पहायला आलेले असतात, त्यावर होईल. तसेच राखीव दिवशीही पाऊस न पडण्याची कोणती खात्री नसते.’
‘हे अत्यंत अयोग्य हवामान आहे. गेल्या काही दिवसात जूनमध्ये आम्हाला सरासरीपेक्षा दुप्पट मासिक पावसाचा अनुभव आला आहे. सहसा हा इंग्लंडमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात कोरडा महिना असतो.’
रिचर्डसन पुढे म्हणाले, ‘या विश्वचषकात एका सामन्याला संपन्न करण्यासाठी आणि सामन्याशी संबंधित असणाऱ्या सर्वकाही गोष्टींसाठी ज्यात प्रसारण आणि देशभरात फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक भाग, असे सर्व मिळून साधारण 1200 लोक साइटवर असतात.’
‘त्यामुळे जर साखळी फेरीत राखीव दिवस ठेवला असता तर कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी लागली असती. उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहे.’
या विश्वचषकात आत्तापर्यंत 11 जूनचा बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, 7 जूनचा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना तर 10 जूनचा दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज संघातील सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे तीन सामने रद्द होण्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर पुढील काही सामन्यांवरही पावसाचे संकट असणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–जेमतेम १८ वर्षीय मुंबईकर खेळाडूची किया सुपर लीगमध्ये निवड
–मोठी बातमी – भारताचा हा खेळाडू इंग्लंडला रवाना, घेऊ शकतो शिखर धवनची जागा