भारातचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला आसीसीच्या आचारसंहीतेचा भंग केल्याबद्दल 1 डिमेरीट गुण आणि सामन्याचे 15 टक्के मानधन कापण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.
भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात डेव्हिड मालनला बाद केल्यानंतर इशांत शर्माने त्याच्याडे पाहत असभ्य हावभाव कले होते.
इशांतच्या या कृतीने आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.1.7 चा भंग झाला होता. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर इशांतने आपली चूक मान्य करत केली होती.
इशांतच्या या कृतीची मैदानावरील पंच आलिम दार आणि क्रिस गॅफोनी यांनी तिसरे पंच मरिस एरॅसमस यांच्याकडे तक्रार केली होती.
बर्मिंघहॅम येथील एजबेस्टन मैदानावर झालेल्या या सामन्यात चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताचा 31 धावांनी पराभव झाला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-अमुलकडून कर्णधार विराट कोहलीच्या खेळीला खास मानवंदना
-कोहलीला भेटायच स्वप्न भंगल, विजय मल्ल्याचा या कारणामुळे झाला…