आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबी 2025 मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. परंतु बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी पाठविण्यास नकार दिल्यानंतर, आयसीसीने हायब्रिड मॉडेलवर त्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्याप पीसीब अशा पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यास तयार नाही, त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 29 नोव्हेंबर रोजी, आयसीसीची पीसीबी आणि बीसीसीआय सोबत बैठक झाली. ज्यामध्ये हायब्रिड मॉडेलवर ते आयोजित करण्यावर एकमत होण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आयसीसीकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. आता अशा बातम्या समोर येत आहेत की, आयसीसीने पीसीबीला त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे.
🚨 BREAKING ON CHAMPIONS TROPHY 🚨
– ICC Board has given PCB a day to mull over Hybrid Model for Champions Trophy and in case they remain adamant other than the Champions Trophy will be held in a different country. (Sports Tak). pic.twitter.com/Pcdbf9qs16
— Tanuj Singh (@ImTanujSingh) November 29, 2024
आयसीसीने आता पीसीबीला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बद्दल चेतावणी दिली आहे. पीटीआच्या बातमीनुसार, आयसीसीने पीसीबला स्पष्टपणे सांगितले आहे की एकतर हायब्रिड मॉडेल स्वीकारा किंवा टूर्नामेंटमधून बाहेर फेकले जाईल. 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने हा निर्णय 30 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे. आयसीसी बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की, भारतीय संघ सहभागी नसलेल्या आयसीसी कार्यक्रमासाठी कोणताही प्रसारक एक पैसाही अदा करणार नाही आणि पाकिस्तानलाही हे माहित आहे. आता पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी हायब्रीड मॉडेलला सहमती दर्शवल्यासच 30 नोव्हेंबरला आयसीसीची बैठक होणार आहे.
आयसीसी बोर्डाच्या सूत्राने पुढे सांगितले की, जर पाकिस्तान हायब्रीड मॉडेलसाठी तयार नसेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या देशात आयोजित करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जो यूएई देखील असू शकतो आणि तेही पाकिस्तानशिवाय. आता सर्वांच्या नजरा आज 30 नोव्हेंबरला होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीकडे लागल्या आहेत. ज्यामध्ये काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.
हेही वाचा-
IND vs AUS: संघाला मोठा धक्का! दुसऱ्या कसोटी सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर
दिल्ली संघाने टी20 मध्ये रचला इतिहास! एका सामन्यात सर्वच खेळाडूंनी केली गोलंदाजी
9 षटकार, 5 चौकार आगामी आयपीएलपूर्वीच इशान किशनची तुफानी खेळी!