भारतीय संघातून बऱ्याच काळापासून बाहेर असलेला यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने (Ishan Kishan) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) खळबळ उडवून दिली आहे. शुक्रवारी (29 नोव्हेंबर) रोजी अरूणाचल प्रदेशविरूद्धच्या सामन्यात इशानने 23 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 9 षटकारांसह 5 चौकार ठोकले. या खेळीमुळे झारखंड संघाने 4.3 षटकातच विजय मिळवला. इशानने अवघ्या 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर अरूणाचल प्रदेश संघ प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 93 धावांवर सर्वबाद झाला. अनुकुल रॉयने (Anukul Roy) 4 षटकांत 2 मेडन्स देत 17 धावांत 4 विकेट्स घेतल्या. अनुकुल राॅय आयपीएल 2025 मध्ये केकेआरचाचा भाग आहे. रवीकुमार यादवने 4 षटकांत 12 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
इशान किशनच्या (Ishan Kishan) खेळीमुळे झारखंड संघाने 94 धावांचे लक्ष्य अवघ्या 4.3 षटकात पूर्ण केले. इशान किशन (Ishan Kishan) 23 चेंडूत 77 धावा करून नाबाद राहिला, तर उत्कर्ष सिंग 6 चेंडूत 13 धावा करून नाबाद राहिला. सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी स्पर्धेत झारखंडचा 4 सामन्यांतील हा तिसरा विजय असून क गटात हा संघ दिल्लीनंतर दुसऱ्या स्थानी आहे.
इशान किशन (Ishan Kishan) आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) खेळताना दिसणार आहे. आयपीएल 2025च्या मेगा लिलावात हैदराबादने त्याला 11.25 कोटी रूपयांना विकत घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंनी बुमराहचे एका शब्दात केले कौतुक! तर कमिन्स म्हणाला….
बीसीसीआयने केले भारतीय संघाच्या नव्या कोऱ्या वनडे जर्सीचे अनावरण…!!!
महिला प्रीमियर लीगचा लिलाव कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या एका क्लिकवर