---Advertisement---

बीसीसीआयने केले भारतीय संघाच्या नव्या कोऱ्या वनडे जर्सीचे अनावरण…!!!

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन वनडे जर्सीचे अनावरण झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) आणि महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) उपस्थितीत नवीन जर्सीचे अनावरण करण्यात आले. भारतीय संघाच्या नवीन वनडे जर्सीवर अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. जर्सीच्या खांद्यावर तिरंगा आहे. जर्सी लाँच केल्यानंतर हरमनप्रीतने त्याची खासियतही सांगितली.

बीसीसीआयने (BCCI) नवीन जर्सीचा व्हिडिओ एक्स आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) दिसली. जर्सीचे अनावरण झाल्यानंतर हरमनप्रीत म्हणाली, माझ्या उपस्थितीत नवीन जर्सीच्या पडद्याचे अनावरण झाले, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी या लूकवर खूप आनंदी आहे. खांद्यावर तिरंग्याचा मला विशेष आनंद झाला आहे.”

वेस्ट इंडिजविरूद्ध महिला भारतीय संघ पहिल्यांदाच नवी जर्सी घालणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघात 3 एकदिवसीय, 3 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. (15 डिसेंबर) पासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने मुंबईत होणार आहेत. (22 डिसेंबर) पासून वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने वडोदरा येथे होणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam) 

महत्त्वाच्या बातम्या-

महिला प्रीमियर लीगचा लिलाव कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या एका क्लिकवर
टेंबा बवुमाचा षटकार पाहून चाहते थक्क! VIDEO होतोय तुफान व्हायरल
पर्थ कसोटीत विराटच्या शतकानंतर भडकला माजी ऑस्ट्रेलिया कर्णधार! म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---