भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान दोन्ही संघातील पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आता दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळला जाणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचे सर्व स्टार खेळाडू बुमराहची शब्दात स्तुती करताना दिसले. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने अतिशय धक्कादायक उत्तर दिले.
अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी एका शब्दात जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) कौतुक केले, तर पॅट कमिन्सने (Pat Cummins) त्याचे वर्णन फक्त एक सामान्य गोलंदाज असे केले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू बुमराहबद्दल बोलताना दिसत होते.
पॅट कमिन्स (Pat Cummins) पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दिसला. कमिन्सने बुमराहची एका शब्दात स्तुती केली आणि म्हणाला, गोलंदाज. त्यानंतर ॲलेक्स कॅरीने बुमराहला ‘अविश्वसनीय’ म्हटले. पुढे, ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) बुमराहला ‘जिनियस’ म्हटले. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) बुमराहला ‘अविश्वसनीय’ म्हटले. उस्मान ख्वाजाने भारतीय बुमराहला ‘कुशल’ म्हटले. नॅथन लायनने त्याला ‘फास्ट’ म्हटले आणि स्टीव्ह स्मिथने त्याला ‘विचित्र’ म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयने केले भारतीय संघाच्या नव्या कोऱ्या वनडे जर्सीचे अनावरण…!!!
महिला प्रीमियर लीगचा लिलाव कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या एका क्लिकवर
टेंबा बवुमाचा षटकार पाहून चाहते थक्क! VIDEO होतोय तुफान व्हायरल