---Advertisement---

दिल्ली संघाने टी20 मध्ये रचला इतिहास! एका सामन्यात सर्वच खेळाडूंनी केली गोलंदाजी

---Advertisement---

सध्या सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी स्पर्धा खेळली जात आहे. दिल्ली क्रिकेट संघाने (Delhi Cricket Team) टी20 क्रिकेटमध्ये मध्ये नवा इतिहास रचला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी (Syed Mushtaq Ali Trophy) टी20 स्पर्धेत दिल्ली संघाने सर्व 11 गोलंदाजांचा वापर केला. कोणत्याही संघाच्या सर्व 11 गोलंदाजांनी गोलंदाजी करण्याची टी20 क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

शुक्रवारी (29 नोव्हेंबर) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25च्या गट क सामन्यात मणिपूर विरूद्ध खेळताना, आयुष बदोनीच्या (Ayush Badoni) नेतृत्वाखालील दिल्ली संघाने नियुक्त केलेल्या यष्टीरक्षकासह सर्व 11 खेळाडूंना किमान 1 षटक दिले. यष्टीरक्षक, कर्णधार आयुष बडोनीने 2 षटके टाकली आणि 1 विकेट देखील घेतली. आयुषने गोलंदाजी करत असताना अनुज रावतने (Anuj Ravat) यष्टिरक्षणाची जबाबदारी घेतली होती.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने 6 गडी राखून विजय मिळवला. मणिपूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी बाद 120 धावा केल्या, हर्ष त्यागी आणि दिग्वेश राठी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. यश धुलच्या (Yash Dhull) अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने 18.3 षटकांत विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

9 षटकार, 5 चौकार आगामी आयपीएलपूर्वीच इशान किशनची तुफानी खेळी!
ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंनी बुमराहचे एका शब्दात केले कौतुक! तर कमिन्स म्हणाला….
बीसीसीआयने केले भारतीय संघाच्या नव्या कोऱ्या वनडे जर्सीचे अनावरण…!!!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---