---Advertisement---

पाकिस्तानची इभ्रत पुन्हा चव्हाट्यावर! आयसीसी घालणार आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदी?

On: मंगळवार, डिसेंबर 13, 2022 7:04 PM
Babar-Azam
---Advertisement---

तब्बल 17 वर्षानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने यजमान संघाचा 2-0 पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. या मालिकेतील रावळपिंडी येथे झालेल्या पहिल्या कसोटीत अक्षरशः धावांचा रतीब घातला गेलेला. मात्र, फलंदाजांसाठी इतक्या पोषक असलेल्या या खेळपट्टीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर मोठ्या प्रमाणात टीका झालेली. आता त्याच कारणाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानमध्ये 2009 साली श्रीलंका संघावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास दहा वर्ष कोणताही आंतरराष्ट्रीय संघ पाकिस्तानात खेळला नव्हता. मागील दोन वर्षात अनेक संघांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. मात्र, मोठा इतिहास असलेल्या रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर आता आयसीसी आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घालू शकते.

पाकिस्तान आणि इंग्लंड कसोटीनंतर आयसीसीने रावळपिंडीच्या खेळपट्टीला सरासरीपेक्षा खराब अशी श्रेणी दिली आहे. त्यामुळे मैदानाच्या खात्यात एक डीमेरिट पॉईंट जमा झाला. एका वर्षाच्या आत या मैदानाला दुसऱ्यांदा डी मेरिट पॉईंट देण्यात आला आहे. त्यामुळे आणखी एक डी मेरिट पॉईंट मिळाल्यास पुढील एक वर्षासाठी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात येणार नाहीत. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कसोटीतही खेळपट्टीवर भरपूर धावा निघाल्या होत्या.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कसोटीचा विचार करायचा झाल्यास सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने तब्बल 506 धावा कुटल्या होत्या. पाच दिवसाच्या खेळात 1800 धावा उभारल्या गेलेल्या. आयसीसी सातत्याने स्पर्धात्मक कसोटी क्रिकेटसाठी प्रयत्न करत आहे. मात्र, अशा प्रकारच्या खेळपट्टीमुळे आयसीसीचा हा उद्देश सार्थ होत नाही.

(ICC has rated the Rawalpindi Test pitch as ‘below average)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पोराचा नाद पूर्ण करण्यासाठी ‌अंबानी घेणार अब्जावधींचा फुटबॉल क्लब विकत? इंग्लंडमध्ये बसवणार बस्तान
बांगलादेशचा कर्णधारही पहिल्या कसोटीला मुकणार? सामन्याच्या 24 तास आधी हॉस्पिटलमध्ये दाखल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---