क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचे स्वप्न अनेकजण लहानपणापासूनच पाहत असतात. मात्र, मोठे होऊन जेव्हा क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळते, तेव्हा खेळाडूंकडून असे काही घडते, ज्यामुळे त्यांची कारकीर्द धोक्यात येते. असेच काहीसे एका क्रिकेटपटूसोबत घडले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने मॅच फिक्सिंग प्रकरणावर मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने यूएईच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूवर एक-दोन नाही, तर तब्बल 14 वर्षांसाठी बंदी आणली आहे. हा खेळाडू इतर कुणी नसून मेहरदीप छावकार आहे.
मेहरदीप छावकार (Mehardeep Chhayakar) या खेळाडूवर 2019मध्ये यूएई आणि झिम्बाब्वे सामन्यादरम्यान झालेली मालिका आणि यावर्षी कॅनडा जीटी20 लीगमध्ये मॅच फिक्सिंग करण्याचे आरोप होते. न्यायाधिकारणात झालेल्या सुनावणीनंतर मेहरदीप आयसीसी आणि कॅनडाच्या लाचलुचपत प्रतिबंधक संहितेचे सात उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला. आयसीसीने एक निवेदन जारी करत मेहरदीपवर बंदी आणल्याची माहिती दिली.
मेहरदीपपूर्वी आयसीसीने त्याच्याशी निगडीत याप्रकरणात यूएईच्या दोन खेळाडूंना लाचलुचपत प्रतिबंधक संहितेचे उल्लंघन केल्याअंतर्गत बंदी आणली होती. मेहरदीप हा यष्टीरक्षक फलंदाज असून तो यूएईच्या अनेक मोठ्या क्रिकेट क्लबकडून खेळला आहे. मेहरदीपने त्याच्यावर लावलेल्या मॅच फिक्सिंगचे सर्व आरोप नाकारले होते. एका खेळाडूला जाणूनबुझून खराब प्रदर्शन करण्यासाठी प्रभावित करण्याच्या दोन प्रकरणात आणि लाचलुचपत प्रतिबंधक संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला.
इतकेच नाही, तर तो मॅच फिक्सिंगबद्दलच्या लावलेल्या सर्व आरोपांच्या चौकशीसाठी सहकार्य न केल्याप्रकरणीही दोषी आढळला. त्यामुळे आयसीसीने इतकी कडक कारवाई केली आहे.
आयसीसीच्या इंटीग्रिटी युनिटचे जनरल मॅनेजर ऍलेक्स मार्शल यांनी यावर वक्तव्य केले. ते म्हणाले की, “मेहरदीप छावकर 2018मध्ये यूएईमध्ये एका स्पर्धेच्या आयोजनानंतरच तपास करणाऱ्यांच्या नजरेत आला होता. या स्पर्धेतही आम्हाला भ्रष्टाचाराची माहिती मिळाली होती. यानंतर आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक युनिटची मेहरदीपवर नजर होती. यांतर त्याने 2019मध्ये यूएई-झिम्बाब्वे मालिकेत मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केला. अशात त्याच्याविरुद्ध इतकी कडक कारवाई करण्यात आली.”
क्रिकेटमधील मॅच फिक्सिंगचे हे प्रकरण आता सर्वेत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणामुळे अनेक खेळाडूंची कारकीर्द संपुष्टात आली आहे. यामध्ये आता मेहरदीप छावकर हे नावही सामील झाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हमे तो अपनोने लूटा’! गांगुलींना पुन्हा व्हायचे होते बीसीसीआय अध्यक्ष? मात्र…
शार्दुलने विमानतळ प्रशासनाशी घेतला पंगा! भारतीय दिग्गजाला करावी लागली मध्यस्थ