---Advertisement---

T20 WC26: ‘नो-लुक शॉट’च्या नादात पाकिस्तानी फलंदाज आऊट, व्हिडिओ व्हायरल

On: शनिवार, फेब्रुवारी 7, 2026 4:59 PM
---Advertisement---

आजपासून (७ फेब्रुवारी) आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरूवात झाली. यामध्ये पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात खेळला गेला. हा सामना पाकिस्तानने शेवटच्या षटकात ३ विकेट्स आणि ३ चेंडू शिल्लक राखत जिंकला. स्पर्धेतील पहिला विजय २००९च्या विजेत्या संघासाठी कसाबसा आला. या सामन्यात पाकिस्तानचा एक फलंदाज सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.

या सामन्यात नेदरलॅंड्सची गोलंदाजी उत्तम होती. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची वरच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. पाकिस्तानचा सलामीवीर सईम अयुबने ज्याप्रकारे आपली विकेट गमावली, यावरून तो चांगलाच ट्रोल होत आहे. त्याने आर्यन दत्तच्या गोलंदाजीवर एक नो-लुक शॉट खेळला. त्याला वाटले षटकार जाईल, मात्र व्हॅन डर मर्वेने तो कॅच पकडला आणि अयुब तंबूत परतला.

क्रिकेटमध्ये नो-लुक शॉट खूपच प्रसिद्ध आहे. ताबडतोब फलंदाजी करणारा खेळाडू पूर्णपणे आत्मविश्वासाने हा शॉट खेळत चेंडूला सीमारेषेपार पाठवतो. हार्दिक पांड्या आणि राशिद खान यांनी अनेकदा हा शॉट खेळला आहे. मात्र अयुबच्या बाबतीत वेगळेच घडले. अचूक वेळेत बरोबर शॉट न मारल्याने त्याने विकेट गमावली. तो १३ चेंडूत २४ धावा करत बाद झाला. यामध्ये त्याने ४ चौकार आणि एक षटकार मारला.

हा सामना पाकिस्तानने जिंकला असला तरी त्यांचा हा विजय शेवटच्या षटकात आला आणि तो पण ७ विकेट्स गमावून. नेदरलॅंड्स सारख्या संघाविरुद्ध पाकिस्तानची कामगिरी निराशाजनकच म्हणावी लागेल. कारण नुकतेच त्यांनी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-० असे पराभूत केले होते.

विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. नेदरलॅंड्सने १९.५ षटकात १० विकेट्स गमावत १४७ धावसंख्या केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १६.१ षटकात ११४ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या.

पाकिस्तानाल विजयासीठी शेवटच्या दोन षटकात २९ धावांची आवशक्यता होती. तेव्हा फहिम अशरफने १९व्या षटकात चौकार-षटकार मारत २४ धावा वसूल केल्या. तसेच शेवटच्या षटकात चौकार मारला आणि पाकिस्तानचा विजय निश्चित केला. तो ११ चेंडूत २९ धावा करत नाबाद राहिला. यामध्ये त्याने ३ षटकार आणि दोन चौकार मारले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---