अफगाणिस्तान संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत चांगल्या लयीत परतला आहे. मागील सामन्यात पाकिस्तानला नमवल्यानंतर आता अफगाणिस्ताने श्रीलंकेला पराभूत करत सलग दुसरा आणि स्पर्धेतील आपला तिसरा सामना जिंकला. त्यापूर्वी त्यांनी पहिला सामना इंग्लंडविरुद्ध जिंकला होता. अफगाणिस्तानने श्रीलंकेला 7 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या विजयानंतर त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत झाल्या आहेत. एका मोठ्या समीकरणाने अफगाणिस्तान उपांत्य सामन्यासाठी पात्र ठरू शकतो.
अफगाणिस्तानचे विजय
अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांनी 3 विजय मिळवले आहेत. तसेच, 3 सामन्यात त्यांच्यावर पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवली आहे. अशात 6 गुणांसह संघ पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. अफगाणिस्तान संघ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियापासून फक्त 2 गुण दूर आहे. न्यूझीलंड संघ तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया संघ चौथ्या स्थानी कायम आहेत. अफगाणिस्तान संघाचे विश्वचषकात अद्याप 3 सामने उरले आहेत. त्यांना अजूनही नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहे. अशात उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी त्यांना हे तिन्ही सामने मोठ्या अंतराने जिंकावे लागतील. त्यानंतर त्यांचा नेट रनरेट वाढेल. तसेच, त्यांचे 3 सामने जिंकल्यानंतर 12 गुण होतील.
महत्त्वाच्या दोन संघांना हरवणे गरजेचे
दुसरीकडे, चौथ्या स्थानी उपस्थित असलेला ऑस्ट्रेलिया संघालाही चालू विश्वचषकात इंग्लंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघाविरुद्ध खेळायचे आहे. जर ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानविरुद्ध पराभूत झाले आणि अफगाणिस्तानला वाटेल की, इंग्लंड आणि बांगलादेशपैकी एखाद्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले, तर ऑस्ट्रेलियाचा 10 गुण होतील.
तसेच, तिसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध सामने खेळायचे आहेत. अशात कदाचित अफगाणिस्तानला प्रार्थना करावी लागेल की, न्यूझीलंडने पुढील दोन्ही सामने गमवावे, ज्यानंतर त्यांचे 10 गुण होतील. त्यानंतर अफगाणिस्तान 12 गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीचा दरवाजा तेव्हाच उघडू शकतो, जेव्हा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ आपले पुढील दोन सामने पराभूत होतील.
तीन वेळा घेतलाय विश्वचषकात भाग
अफगाणिस्तान संघाने वनडे विश्वचषक 2015 आणि 2019 विश्वचषकात भाग घेतला होता. मात्र, संघ एकदाही उपांत्य फेरीत पोहोचला नाही. विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी अफगाणिस्तानने 2015 विश्वचषकात फक्त स्कॉटलंडविरुद्ध सामना जिंकला होता. या विश्वचषकात संघ लयीत दिसत आहे. त्यांनी 3 सामने जिंकले असून, संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकतो. (icc odi world cup 2023 afghanistan cricket team semifinal qualification scenario australia new zealand know here)
हेही वाचा-
अफगाणिस्तानच्या विजयाने ‘या’ संघाचे भलेमोठे नुकसान, Points Tableमध्ये घसरला सातव्या स्थानी
काळीज तोडणारी बातमी! चालू वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या सर्वात मोठ्या फॅनचे निधन, रोहितशी होते खास कनेक्शन