यावर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. बीसीसीआय या आगामी स्पर्धेसाठी जोमात तयारी करत आहे. सध्या विश्वचषकासाठी झिम्बाब्वेमध्ये क्वॉलिफायर सामने खेळले जात आहेत. आयसीसीकडून अद्याप विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले गेले नाहीये, पण आता मोठी अपडेट समोर आली आहे. विश्वचषकाचे वेळापत्रक लवकरच चाहत्यांच्या हाती येऊ शकते.
यावर्षी अखेरच्या काही महिन्यांमध्ये वनडे विश्वचषक (ICC ODI World Cup 2023) खेळवला जाणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा पार पडण्याची पूर्ण शक्यता मागच्या बऱ्याच दिवसांपासून वर्तवली जात आहे. भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ म्हणजेच बीसीसीआयेन आधीच आयसीसीकडे वेळापत्रकाचा कच्चा नमून पाठवला आहे. पण अद्यावर यावर शेवटचा निर्णय घेतला गेला नाहीये.
असे असले तरी, माध्यमांमध्ये असे सांगितले जात आहे की, पुढच्या आठवड्यात वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होईल. क्रिकेबजच्या एका वृत्तानुसार वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक येत्या 27 जून रोजी जाहीर केले जाऊ शकते. यासाठी मुंबईत मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन होणार असल्याचेही सांगितेल जात आहे. दरम्यान, अशाही बामतम्या समोर आल्या आहेत की, एकट्या पाकिस्तान संघामुळे विश्वचषकाचे वेळापत्रक लवकर चाहत्यांना मिळत नाहीये. बीसीसीआयने आयसीसीकडे सादर केलेले नमून वेळापत्रक पीसीबीला मान्य नाहीये. अशात त्यांनी या वेळापत्रकाला विरोध केला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार पाकिस्तानने आयपल्या सामन्यांपैकी दोन सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. चेन्नई आणि बेंगलोर शहरात पाकिस्तानला एकही सामना खेळण्याची इच्छा नाहीये. जी त्यांनी आयसीसीपुढे मांडली. पण आयसीसीकडूनही त्यांची मागणी पूर्ण झोली नाही, असेच दिसते. अशात पुढच्या आठवड्यात विश्वचषकाचे वेळापत्रक समोर आल्यानंतर पाकिस्तान कुठे खेळणार, हे पाहिण्यासारखे असेल. (ICC ODI World Cup 2023 schedule may be announced soon)
महत्वाच्या बातम्या –
हद्दच केली! चेंडू टाकण्याआधी वाचली स्क्रिप्ट, वर्ल्डकप क्वॉलिफायर सामन्यातील VIDEO तुफान व्हायरल
यावेळीही पुजाराच बळीचा बकरा! माजी कर्णधाराने साधला विराट-रोहितवर निशाणा