जगभरातील कोरोना महामारीमुळे संपूर्ण क्रीडाविश्व ठप्प होतं. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट हळूहळू पुनरागमन करत आहे. याच दरम्यान खेळाबरोबरच भ्रष्टाचारही परतला आहे. आयसीसीने रविवारी संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दोन खेळाडूंना मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठी कारवाई करत निलंबित केले आहे. आमिर हयात आणि अशफाक अहमद हे दोन खेळाडू युएई संघाकडून खेळत आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयसीसीने दोन्ही खेळाडूंना १४ दिवसांच्या आता उत्तर देण्यास सांगितले आहे. हे खेळाडू प्रत्युत्तर देण्यात अयशस्वी झाल्यास त्यांच्यावर आजीवन बंदी घातली जाऊ शकते.
आयसीसीने जाहीर केलेल्या प्नेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, “दोन्ही खेळाडूंवर केलेल्या आरोपांवर त्यांना उत्तर देण्यासाठी १३ सप्टेंबरपासून १४ दिवसांचा कालावधी आहे.” उत्तर मिळेपर्यंत आयसीसी या आरोपांबाबत कोणतेही भाष्य करणार नाही.
युएई क्रिकेट बोर्डाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धेदरम्यान अशफाक याला निलंबित केले होते. परंतु त्याच्यावर अधिकृतपणे केलेले आरोप सिद्ध झाले नव्हते. या दोन्ही खेळाडूंवर पैसे घेऊन सामना फिक्सिंग केल्याचा आणि सामन्यात जाणीवपूर्वक खराब कामगिरी केल्याचा आरोप आहे.
महत्त्वाचे म्हणजे आमिर हयात एक मध्यमगती गोलंदाज म्हणून युएईकडून खेळतो, जो आतापर्यंत त्याच्या कारकीर्दीत ९ वनडे आणि ४ टी२० सामने खेळला आहे. तर अशफाक अहमदने युएईसाठी १६ वनडे आणि १२ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
आमिर हयात आणि अशफाक अहमद यांच्यावर आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या कलम २.१.३ अन्वये पहिला आरोप लावण्यात आला आहे. तर कलम २.४.२ पासून ते २.४.५ पर्यंत अन्य ४ आरोप लावण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-पराक्रम केलाय ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने, आनंद झाला युएईमध्ये असलेल्या विराट कोहलीला
-क्रिकेटच्या खेळपट्टीवर चक्क डान्स करताना दिसला विराट कोहली; पहा व्हिडिओ
-शतक ठोकलेला फलंदाज म्हणतो, मी कितीही धावा केल्या, तरी मला संघात स्थान मिळू शकत नाही
ट्रेंडिंग लेख-
-सीपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे हे ५ खेळाडू आयपीएलमध्येही धमाका करण्यास सज्ज






