आज(16 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिसचा 45 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्याला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. पण या सर्वात आयसीसीने त्याला दिलेल्या हटके शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आयसीसीने कॅलिसच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ इतक्या सुरेखरित्या एडिट केला आहे, की अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. या व्हिडिओमध्ये कॅलिसच कॅलिसला फलंदाजी करत आहे, तसेच त्याचवेळी कॅलिसच क्षेत्ररक्षणही करत आहे, असे दाखवले आहे. थोडक्यात कॅलिस हा किती महान अष्टपैलू क्रिकेटपटू आहे, हे सांगण्याचा या व्हिडिओचा उद्देश होता.
या व्हिडिओला आयसीसीने कॅप्शन दिले आहे की ‘वाढदिवस विशेष. जॅक कॅलिसशी तुलना होऊ शकतील असे फार कमी क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे आम्ही या महान अष्टपैलूला त्याच्याचविरुद्ध उभे केले आहे.’
Birthday special 🎂
Few cricketers can compare to Jacques Kallis. So we pitted the great all-rounder against himself!
📹 ⬇️ pic.twitter.com/bM482YKzeQ
— ICC (@ICC) October 16, 2020
कॅलिसने 14 डिसेंबर 1995 ला वयाच्या 20व्या वर्षी इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यात कॅलिसला खास काही करता आले नाही. त्याला 1 धावेवर पीटर मार्टीनने बाद केले. मात्र त्यानंतर त्याने त्याच्या सातव्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले.
कॅलिसने त्याच्या 18 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत 166 सामने खेळले. यात त्याने सचिन पाठोपाठ सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही केला. कॅलिसने कसोटीत 45 शतके आणि 58 अर्धशतकांसह 55.37 च्या सरासरीने 13289 धावा केल्या. याशिवाय कॅलिसने 250 पेक्षा जास्त विकेटही घेतल्या.
याशिवाय कॅलिसने वनडेत 328 सामन्यात 17 शतके आणि 86 अर्धशतकांसह 44.36 च्या सरासरीने 11579 धावा केल्या. तसेच गोलंदाजी करताना त्याने 273 विकेट्स घेतल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये त्याने 25 सामन्यात 5 अर्धशतकांसह 666 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत 12 विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नाही तर कॅलिसने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 338 झेलही घेतले आहेत. त्याला 57 वेळा सामनावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
वाचा –
-कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारे ४ फलंदाज
-वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे ५ क्रिकेटर्स
-लॉर्ड्सवरील ऑनर्स बोर्डवर नाव नसलेले ५ महान फलंदाज