आयसीसीच्या ताच्या क्रमवारीत मार्नस लाबुशेन याने कामाल करून दाखवली. कसोटी क्रमवारीत लाबुशेन जो रुट याला मागे टाकले आणि पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला. एकदिवसीय क्रिमवारीत देखील मोठे फेरबदल पाहायला मिळाले. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी बांगलादेशविरुद्ध केलेल्या प्रदर्शनानंतर क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. गोलंदाजांमध्ये भारताचा मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकर याच्यासह इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसन यालाही लाभ झाला.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) बुधवारी (7 डिसेंबर) जाहीर झालेल्या ताच्या क्रमवारीत एकदिवसीय फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 9 आणि 10 क्रमांकावर आहेत. पहिल्या 10 फलंदाजांमध्ये रोहित आणि विराट या दोघा भारतीयंचा समावेश आहे. बांगलादेशविरुद्ध श्रेयस अय्यरने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 24, तर न्यूझीलंडविरुद्ध 80 आणि 49 धावांची खेळी केली होती. याच पार्श्वभूमीवर अय्यरला एकदिवसीय क्रमवारीत फायदा झाला आणि तो सात स्थानांची झेप घेत 20 व्या क्रमांकावर पोहोचला. केएल राहुल बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 73 धावांची खेळी करू शकला होता. या खेळीचा फायदा त्याला क्रमवारीत झाला आहे. राहुल ताज्या वनडे क्रमवारीत 35 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. वडने क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या, इमाम उल हक दुसऱ्या, तर रस्सी वॅन डर ड्युसेन तिसऱ्या क्रमांकावर कायम आहेत.
गोलंदाजी विभागात भारतीय संघाचे मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) यांनी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेत चांगली गोलंदाजी केली. याचा फायदा त्यांना क्रमवारीत झाला. सिराज श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा याच्यासोबत संयुक्तरित्या 26 व्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे शार्दुलने 9 स्थानांची झेप घेत 42 वा क्रमांक गाठला आहे. बांगलादेशचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू शाकिब अल हसन याने भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या. या जबरदस्त प्रदर्शनानंतर त्याला ताज्या क्रमवारीत सात स्थानांची फायदा झाला. सध्या शाकिब 9व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार राशिद खान देखील वनडे क्रमवारीत चार स्थानांच्या फायद्यासह 6व्या क्रमांकावर पोोहचाल आहे. राशिदने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने 37 धावा खर्च करत चार विकेट्स घेतल्या होत्या.
कसोटी क्रमवारीत मार्नस लाबुशेन पहिल्या क्रमांकावर
ऑस्ट्रेलियाचा वरच्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशेन (Marnus labhuchagne) याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम फलंदाजी केली. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असून, विजयात लाबुशेनचे योगदान महत्वाचे राहिले. त्याने पहिल्या डावात द्विशतक, तर दुसऱ्या डावात शतक केले. या खेळीच्या जोरावर लाहुशेन कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. मागच्या मोठ्या काळापासून तो जो रुटच्या मागे होता, पण बुधवारी अखेर त्याला पहिला क्रमांक मिळाला. दुसरीकडे रूट मात्र चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. रुटच्या पुढे स्टीव स्मिथ आणि बाबर आझम यांचा क्रमांक आहे. भारताचा रिषभ पंत कसोटी क्रमावारीत पाचव्या क्रमांकावर आहे. कसोटी क्रमवारीत इंग्लंड दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यालाही फायदा झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अँडरसनने एकूण पाच विकेट्स घेतल्या आणि याच पार्श्वभूमीवर त्याला कसोटी क्रमवारीत तिसरा क्रमांक मिळाला. पूर्वी अँडरसन पाचव्या क्रमांकावर होता. (In ICC Ranking Marnus Labuschagne on top in Tests, Shreyas Iyer and KL Rahul benefit in ODIs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे असं कोणी कॅच घेत का! धवनने पायांचा वापर करुन घेतलेला झेल झाला व्हायरल
दीपक हुड्डाने वाढवली टीम इंडियाची डोकेदुखी! रोहितनंतर संघातील दुसरा खेळाडू दुखापतग्रस्त