आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर- 4 फेरीतील तिसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. खरं तर, बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाची वनडेतील बादशाहत संपली आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा जगातील अव्वल वनडे संघ बनला आहे.
अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलिया
अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेत 3-0ने विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) संघाने ऑस्ट्रेलियाकडून वनडेतील अव्वल क्रमांक हिसकावला होता. मात्र, बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाला ही बादशाहत जास्त काळ टिकवता आली नाही. ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 123 धावांनी विजय मिळवत पुन्हा एकदा संघांच्या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Team Rankings) अव्वलस्थान पटकावले.
We have a new team at the 🔝 of the @MRFWorldwide ICC Men's ODI Rankings 🙌
Details 👇https://t.co/1KobAJHjX2
— ICC (@ICC) September 9, 2023
ऑस्ट्रेलियाचे जबरदस्त प्रदर्शन
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना सलामीवीर डेविड वॉर्नर आणि मार्नस लॅब्यूशेन याने धमाल केली. वॉर्नरने 93 चेंडूत 106 धावांची शतकी खेळी साकारली, तर लॅब्यूशेन यानेही 99 चेंडूत 124 धावांचा पाऊस पाडला. तसेच, ट्रेविस हेडने 64, तर जोश इंग्लिस याने 50 धावांचे योगदान दिले. हेड आणि वॉर्नरमध्ये पहिल्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी अवघ्या 11.5 षटकात झाली होती. यानंतर वॉर्नर आणि लॅब्यूशेनमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्स गमावत 392 धावांचा डोंगर उभारला.
झम्पाची कमाल
ऑस्ट्रेलियाच्या 393 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आल्या. त्यांचा डाव 41.5 षटकात 269 धावांवरच संपुष्टात आला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पा चमकला. त्याने 9 षटके गोलंदाजी करताना 48 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त सीन ऍबॉट, नेथन एलिस आणि ऍरॉन हार्डी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. (icc rankings australia became number one odi team after defeating south africa in 2nd odi ind vs pak)
हेही वाचाच-
IND vs PAK सामन्यापूर्वी रोहितसेनेला अख्तरची चेतावणी; व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ
श्रीलंकेच्या विजयामुळे ‘या’ संघाचा पत्ता कट! पाहा Asia Cup 2023चा लेटेस्ट Points Table