आयसीसीने बुधवारी (२६ ऑगस्ट) जाहीर केलेल्या फलंदाजांच्या ताज्या वनडे क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (८७१) आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने (८५५) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आपले वर्चस्व राखले आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. त्यानंतर विराट आणि मार्नस लॅब्यूशाने अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल (८२३) पाकिस्तानच्या बाबर आझमनंतर (८७९) टी२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलनंतर ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंच या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ताजी आयसीसी क्रमवारी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या वनडे गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स कसोटीत, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट वनडेत आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहेत.
संघाबाबत बोलायचं झालं तर भारतीय संघ वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोबतच कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
क्राऊलेने घेतली झेप, तर अँडरसन टॉप-१०मध्ये
मंगळवारी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील तीन सामन्यांची कसोटी मालिका संपली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज झॅक क्राऊलेच्या शानदार २६७ धावांची द्विशतकी खेळी केली, तर वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या ७ विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. हा सामना अनिर्णित राहिला; त्यामुळे इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध मालिकेत १-०ने विजय मिळवला. या मालिकेनंतर कसोटी क्रमवारी जाहिर करण्यात आली आहे.
क्राऊलेने इंग्लंड संघासाठी तिसऱ्या कसोटीत १०वी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली होती. त्यामुळे त्याने कसोटी फलंदाजी क्रमवारीत ५३ स्थानांची प्रगती करत कारकिर्दीतील सर्वोत्तम २८ वे स्थान मिळवले आहे. तो पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळण्यापूर्वी ९५ व्या क्रमांकावर होता.
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेदरम्यान कारकिर्दीत ६०० कसोटी विकेट्स पूर्ण करणारा अँडरसनने कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल १० क्रमांकामध्ये पुनरागमन केले असून तो ७८१ गुणांसह ८ व्या क्रमांकावर आला आहे.
बटलरलाही झाला फायदा, स्टोक्सने गमावला अव्वल क्रमांक
जॉस बटलरने पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटीत आपल्या खेळीदरम्यान १५२ धावा केल्यानंतर तो आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत विशेष प्रगती करणारा इंग्लंडचा आणखी एक खेळाडू ठरला आहे. तो कारकिर्दीतील सर्वोत्तम ६३७ गुणांसह २१ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची मात्र कसोटी अष्टपैलू क्रमवारीत घसरण झाली आहे. तो पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या २ सामन्यात खेळला नव्हता. तो आता क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे.
अझर अलीलाही झाला शतकाचा फायदा
पाकिस्तान संघाचा कर्णधार अझर अलीला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात केलेल्या १४१ धावांच्या खेळीमुळे ११ स्थानांची मदत झाली असून तो २३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सोबतच यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला अर्धशतकी खेळी केल्यानंतर ७२ व्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी मदत झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएलदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेबाबत बीसीसीआय सज्ज, ही कंपनी करणार २० हजारपेक्षा अधिक चाचण्या
-एकेकाळी कर्णधारपदावरून काढत वगळले होते संघातून, आता त्याच खेळाडूने ठोकले त्रिशतक
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलचा अंतिम सामना न खेळताही विजेतेपद पटकावणारे शिलेदार
-क्रिकेटमधील हे १० हटके स्टॅट्स आजचा तुमचा दिवस करतील खास, पहा
-वेगवान गोलंदाजाने आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणं सोप्पं नाही, या दिग्गजांनी केलाय तो पराक्रम