---Advertisement---

BREAKING: आयसीसीने इंदोर खेळपट्टीला म्हटले ‘खराब’, चार वर्षात दुसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत…

---Advertisement---

शुक्रवारी (दि. 03 मार्च) इंदोर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच शेवट झाला. हा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया संघाने 9 विकेट्सने खिशात घातला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले. मात्र, त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीला खराब असा शेरा दिला आहे.

मालिकेतील पहिले दोन सामने एकतर्फी जिंकलेला भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 109 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उस्मान ख्वाजाच्या फलंदाजीच्या जोरावर 88 धावांची आघाडी मिळवली. भारतीय संघाने दुसऱ्या डावातही केवळ 163 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी 76 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी फक्त एक बळी गमावत 18.5 षटकातच 78 धावा करून सामना जिंकला. यासह मालिका देखील 2-1 अशा फरकावर आली.

हा सामना संपल्यानंतर आयसीसीने सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीला शेरा दिला. या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशीपासून चेंडू अधिक फिरकी घेत होता. तसेच, खेळपट्टीवरील माती देखील अगदी पहिल्या षटकात निघालेली दिसली. त्यामुळेच आयसीसीने या खेळपट्टीला खराब असा शेरा दिल्याचे सांगितले. यासह खेळपट्टीला तीन डीमेरिट पॉईंट देखील देण्यात आले. एका वर्षात आणखी एकदा असे घडल्यास मैदानावर काही कालावधीसाठी बंदी घातली जाऊ शकते.

मालिकेतील पहिले दोन सामने देखील तिसऱ्या दिवशी संपले होते. मात्र, त्या खेळपट्टीला आयसीसीकडून सरासरी म्हटले गेलेले. आयसीसीकडून प्रत्येक कसोटी सामन्यानंतर खेळपट्टीला शेरा दिला जातो. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध मागील दौऱ्यात पुणे येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यातील खेळपट्टीला खराब असा दर्जा देण्यात आलेला. त्यानंतर बेंगलोर येथील खेळपट्टीला देखील सरासरीपेक्षा खराब असा शेरा दिला गेलेला. मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.

(ICC Rates Indore Test Pitch Poor)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! संघाला टी20 वर्ल्डकपमध्ये घेऊन जाणाऱ्या कर्णधाराची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
दिग्गजाने रोहितच्या नेतृत्वावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह! म्हणाला, “कर्णधार म्हणून तो कमी पडला” 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---